फिफा धूम-धाम!

रोनाल्डोची देशाप्रती निष्ठा कायम


Ronaldo Says 'Won't Make Rash Decisions' Following Last World Cup Game


उपांत्यपूर्व फेरीत स्पेनकडून झालेल्या पराभवानंतरही ख्रिस्तियानो रोनाल्डोने पोर्तुगालप्रती असलेले आपले प्रेम आणि बांधिलकी अधोरेखित केली. मिकेल मेरिनोच्या अखेरच्या क्षणी झालेल्या निर्णायक गोलमुळे पोर्तुगालचे विश्वचषकातील आव्हान संपुष्टात आले. सामन्यापूर्वीच हा आपला अखेरचा फिफा विश्वचषक असल्याची घोषणा करणारा रोनाल्डो पराभवानंतर अश्रूंनी भरलेल्या डोळ्यांनी मैदानाबाहेर पडला. मात्र या कठीण क्षणीही त्याने संघाची साथ सोडली नाही. सामन्यानंतर रोनाल्डोने आपल्या इन्स्टाग्राम खात्यावर पोर्तुगाल संघाच्या एकत्रित छायाचित्रासह ‘पोर्तुगाल सदैव’ असा संदेश पोस्ट केला.




एम्बाप्पे-डेम्बेलेची खास मिठी


🚨 Ousmane Dembélé and Kylian Mbappé in PSG training together. 🇫🇷 (📸  @PSG_inside)


मोरोक्कोविरुद्धच्या महत्त्वाच्या सामन्यापूर्वी फ्रान्सच्या शिबिरातील वातावरण सकारात्मक असल्याचे चित्र समोर आले. संघाचा कर्णधार किलियन एम्बाप्पे आणि बॅलन डी'ऑर विजेता ओस्मान डेम्बेले यांची सरावादरम्यानची खास मिठी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे. फ्रान्स संघाच्या अधिकृत एक्स खात्यावर शेअर करण्यात आलेल्या छायाचित्रांमध्ये एम्बाप्पे आणि डेम्बेले एकमेकांना मिठी मारत हसताना दिसले. दोघांमध्ये मतभेद असल्याच्या चर्चांदरम्यान समोर आलेल्या या छायाचित्रांनी संघातील एकजूट अधोरेखित केली.




फिफाने इजिप्तच्या आरोपांना फेटाळले


FIFA World Cup 2026: Egypt file complaint against referee after match with  Argentina - The Hindu


अर्जेंटिनाविरुद्धच्या पराभवानंतर इजिप्तने केलेल्या पंचांवरील आरोपांना फिफाचे रेफरी प्रमुख पियरलुईजी कॉलिना यांनी ठामपणे फेटाळून लावले आहे. फुटबॉलमध्ये पंचांच्या निर्णयांवर चर्चा होणे स्वाभाविक असले तरी त्यांच्या प्रामाणिकतेवर विनाकारण शंका घेणे अस्वीकार्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. फिफाच्या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत कॉलिना म्हणाले, "निर्णयांवर रचनात्मक चर्चा होऊ शकते, मात्र आधारहीन आरोपांना फुटबॉलमध्ये स्थान नाही. फिफा विश्वचषकातील पंचांच्या प्रामाणिकतेवर कोणीही प्रश्न उपस्थित करू शकत नाही.




जस्टिन बीबर अन् शकिरा एकाच मंचावर


Justin Bieber Set To Co-Headline With Madonna, Shakira & BTS At FIFA World  Cup 2026 Final Halftime Show


फिफा आणि ग्लोबल सिटिझन यांनी फिफा विश्वचषक अंतिम सामन्याच्या हाफटाइम शोसाठी कॅनेडियन पॉप स्टार जस्टिन बीबरची घोषणा केली आहे. १९ जुलै रोजी न्यूयॉर्क-न्यू जर्सी स्टेडियममध्ये होणाऱ्या अंतिम सामन्यात बीबर मॅडोना, शकिरा आणि बीटीएस यांच्यासोबत सह-हेडलाइनर म्हणून सादरीकरण करणार आहे. या कार्यक्रमात जगातील काही सर्वाधिक लोकप्रिय संगीत कलाकार एकाच मंचावर दिसणार आहेत. शकिरासोबतचे ‘दाई दाई’ हे गाणे जागतिक स्तरावर गाजवणारा बर्ना बॉयही या विशेष कार्यक्रमात सहभागी होणार आहे. अवघ्या ११ मिनिटांच्या हाफटाइम शोचे दिग्दर्शन आणि संकल्पना कोल्डप्लेचा प्रमुख गायक ख्रिस मार्टिन सांभाळणार आहे. हा कार्यक्रम केवळ मनोरंजनासाठी नसून सामाजिक उद्दिष्टांशीही जोडलेला आहे.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव