Malegaon : सरकारकडून महिन्याला चांगला पगार मिळत असतानाही अनेक सरकारी बाबूंची पैश्यांची हाव काही संपत नाही. संतापजनक म्हणजे ज्या शेतकऱ्याला आधीच अस्मानी संकटांनी सतावून सोडले त्याला त्रास देण्यासाठी काही सरकारी बाबुही आपल्याच आजूबाजूला फिरताय. मालेगाव येथील मृद व जलसंधारण उपविभागातील (Soil and Water Conservation Sub-division) कनिष्ठ लिपिक श्रीकांत पाटील याला ५,००० रुपयांची लाच घेताना एसीबीच्या पथकाने रंगेहाथ पकडले आहे. श्रीकांत पाटील याने शेताच्या सुपीकतेसाठी पाझर तलावातून गाळ काढण्याच्या कामात भ्रष्टाचार केल्याचं समोर आलं आहे.
Nashik : नाशिक शहर आणि जिल्ह्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर, वीज पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी महावितरणची संपूर्ण यंत्रणा आणि कर्मचारी ...
नेमकं प्रकरण काय ?
तक्रारदाराच्या मित्राने आपले शेत सुपीक करण्यासाठी नांदगाव (Nandgaon) तालुक्यातील घोरपडी पाझर तलावातून गाळ काढण्याकरिता मालेगाव येथील उपविभागीय मृद व जलसंधारण उपविभागाकडे अर्ज केला होता. तशी त्यांना गाळ काढण्याची रीतसर परवानगी देखील मिळाली. महत्त्वाचे म्हणजे या गाळ उपसाच्या कामासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांचा इंधन खर्च शासनाकडून दिला जातो.
श्रीकांत पाटील यांना फक्त हे बिल मंजूर करायचे होते, त्यासाठी त्यांच्या खिशातून एकही रुपया जाणार नव्हता. मात्र श्रीकांत पाटील यांना याठिकाणी भ्रष्टाचाराची संधी दिसली. पाझर तलावातील गळाप्रमाणे बहुतेक पाटील यांच्याही डोक्यात गाळ साचला असावा बहुतेक त्यामुळेच वाहनांचे डिझेल बिल मंजूर करून देण्याच्या मोबदल्यात, या कार्यालयातील कनिष्ठ लिपिक श्रीकांत काशिनाथ पाटील (Shrikant Kashinath Patil) (वय ३६, रा. धुळे) याने तक्रारदाराकडे ५,००० रुपयांची लाच मागितली.
Nashik Rain Update : नाशिक शहरासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पाणीच पाणी झाल्याचं चित्र आहे. महत्त्वाचे म्हणजे गोदावरी ...
असा रचला सापळा
सुजाण नागरिक असल्याने आणि लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने या प्रकरणी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे (Nashik Anti-Corruption Bureau) तक्रार नोंदवली. त्यानुसार एसीबीच्या पथकाने ८ जुलै २०२६ रोजी मालेगाव येथील संबंधित कार्यालयातच सापळा रचला. तेव्हा पंचांसमक्ष ५,००० रुपयांची लाचेची रक्कम स्वीकारताना श्रीकांत पाटील याला पथकाने रंगेहाथ पकडण्यात आले. या प्रकरणी येथील कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पाटील याला अटक करण्यात आली आहे.
कारवाई करणारे पथक
ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अप्पर पोलीस अधीक्षक प्रदीप मैराळे आणि कविता फडतरे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. सापळा अधिकारी पोलीस निरीक्षक राहुलकुमार नाईक यांच्या नेतृत्वाखालील पथकात पोलीस हवालदार प्रफुल्ल माळी, विलास निकम आणि समीर शेख यांचा सहभाग होता. या प्रकरणी तपास अधिकारी म्हणून पोलीस उपअधीक्षक संतोष पैलकर हे काम करीत आहेत.
- महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे; अटींचा भंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई मुंबई : पुणे व कोकण विभागातील पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील क्षेत्रांतील शासकीय ...
तर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाला संपर्क करा
कोणत्याही शासकीय कामासाठी जर कोणी लोकसेवक लाच मागत असेल, तर नागरिकांनी घाबरून न जाता लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधावा, असे आवाहन लाचलुचपत प्रतिबंधक विभागातर्फे करण्यात आले आहे. त्यासाठी टोल फ्री क्रमांक: १०६४ ,व्हॉट्सॲप क्रमांक: ९९३०९९७७००, दूरध्वनी: ०२५३-२५७५६२८ / २५७८२३० किंवावेबसाईट: acbmaharashtra.gov.in येथे संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.






