पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांची विधानसभेत माहिती; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून प्रकल्पाला मंजुरी
Veer Jeevaji Mahale : किल्ले प्रतापगडाच्या पायथ्याशी वीर जीवाजी महाले यांचे भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय राज्य सरकारने (State Government) घेतला आहे. या प्रकल्पासाठी प्रथम टप्प्यात 1 कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी गुरुवारी विधानसभेत दिली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्णयातून हा प्रकल्प साकार होणार असल्याचे देसाई यांनी सांगितले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या महाबळेश्वर दौऱ्यादरम्यान विविध शिवप्रेमी संघटनांनी वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी केली होती. त्यानंतर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांशी चर्चा करून पर्यटन विभागामार्फत प्रतापगडाच्या पायथ्याशी भव्य स्मारक उभारण्याचा निर्णय घेण्यात आला.
पुणे-मुंबई घाट विभागातील (Pune-Mumbai Ghat Section) रेल्वे मार्गाच्या (Railway Line) दुरुस्तीच्या (Restoration Works) कामांचा रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी आढावा घेतला. मुसळधार ...
देसाई म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या इतिहासात वीर जीवाजी महाले यांचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रतापगडाच्या ऐतिहासिक लढाईत त्यांनी समयसूचकता, धाडस आणि पराक्रमाचे दर्शन घडवत छत्रपती शिवाजी महाराजांचे प्राण वाचवले. "होता जीवा म्हणून वाचला शिवा" ही उक्ती त्यांच्या शौर्याची साक्ष देणारी असल्याचे त्यांनी नमूद केले.
दरवर्षी 10 नोव्हेंबर रोजी प्रतापगडावर शिवप्रताप दिन मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सोहळ्यासाठी लाखो शिवप्रेमी, इतिहास अभ्यासक, विद्यार्थी तसेच देश-विदेशातील पर्यटक प्रतापगडाला भेट देतात. त्यामुळे प्रतापगडाचे ऐतिहासिक आणि पर्यटनदृष्ट्या महत्त्व सातत्याने वाढत असल्याचेही त्यांनी सांगितले.
मुंबई : राज्यातील प्रशासकीय यंत्रणेला (Administrative System) अधिक गती देण्यासाठी राज्य सरकारने पुन्हा एकदा मोठा प्रशासकीय निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री (Chief Minister) ...
वीर जीवाजी महाले यांचे स्मारक उभारण्याची मागणी अनेक वर्षांपासून विविध सामाजिक संस्था, इतिहास संशोधक, शिवप्रेमी संघटना आणि लोकप्रतिनिधींकडून होत होती. शासनाने या मागणीची दखल घेत पर्यटन विभागाच्या जागेवर हे स्मारक उभारण्याचा निर्णय घेतला असून, प्रथम टप्प्यात 1 कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात येणार आहे.
हे स्मारक उभारल्यानंतर प्रतापगडाच्या शिवकालीन वारसा पर्यटनाला नवी चालना मिळेल. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन नकाशावर प्रतापगडाची ओळख अधिक बळकट होऊन देश-विदेशातील पर्यटकांसाठी ते आणखी एक महत्त्वाचे आकर्षण ठरेल, असा विश्वास पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी व्यक्त केला.




