- मुख्य सचिवांना अर्ध्या तासाच्या आत सभागृहात हजर राहण्याचे आदेश
मुंबई : विधानसभेत बुधवारी नियम २९३ अन्वये प्रस्ताव चालू असताना सभागृहात सरकारच्या वतीने एकही मंत्री आणि सचिव उपस्थित नसल्यामुळे अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी संताप व्यक्त केला. मंत्रालयात ११० सचिवांना सरकार वेतन देते, त्यातील ४ सचिवही सभागृहात उपस्थित राहू शकत नाहीत का, पुढील अर्ध्या तासात राज्याचे मुख्य सचिव सभागृहात उपस्थित राहिले नाहीत, तर सभागृहाचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करेन, असे निर्देश देऊन राहुल नार्वेकर यांनी सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी स्थगित केले.
- कॅबिनेट सोडून शिंदे पवारांच्या भेटीला; चर्चेचा तपशील गुलदस्त्यात, रोहित पवार गैरहजर मुंबई : विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरू असताना, बुधवारी विधान ...
अध्यक्ष राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांच्या निर्देशानंतर राज्याचे मुख्य सचिव राजेश अग्रवाल सभागृहात उपस्थित झाले. सभागृह पुन्हा चालू झाल्यावर संसदीय कार्यमंत्री चंद्रकांत पाटील यांनी मंत्रीमंडळाची बैठक असल्यामुळे मंत्री तेथे गेल्याची माहिती सभागृहात दिली. त्यावर राहुल नार्वेकर (Rahul Narwekar) यांनी सभागृहाच्या कामकाजापेक्षा कोणतेही काम महत्त्वाचे नाही, असे स्पष्ट केले.





