Schools Open : राज्यातील सर्व शाळा गुरुवारी सुरू राहणार; शाळा बंद ठेवल्यास वेतन कपातीची कारवाई

मुंबई : ९ जुलै २०२६ रोजी प्रस्तावित शाळा बंद आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कोणतीही शाळा बंद राहणार नसल्याचे स्पष्ट करत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक हिताला प्राधान्य देण्याचे निर्देश माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक डॉ. महेश पालकर यांनी दिले आहेत. तसेच आंदोलनाच्या दिवशी शाळा बंद ठेवल्यास संबंधित मुख्याध्यापक, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांवर एका दिवसाच्या वेतन कपातीची कारवाई करण्यात येणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.



विविध माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालेल्या बातम्यांनुसार राज्यातील खासगी अनुदानित, अंशतः अनुदानित व विनाअनुदानित शाळांतील मुख्याध्यापक, शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी त्यांच्या विविध मागण्यांसाठी ९ जुलै रोजी शाळा बंद आंदोलनात सहभागी होणार असल्याचे वृत्त समोर आले होते. या पार्श्वभूमीवर माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालकांनी सर्व विभागीय शिक्षण उपसंचालक, जिल्हा परिषदांचे शिक्षणाधिकारी (माध्यमिक) तसेच बृहन्मुंबईतील शिक्षण निरीक्षक यांना आवश्यक सूचना जारी केल्या आहेत.



विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्यासाठी सर्व शाळा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश देण्यात आले असून ९ जुलै रोजी कोणतीही शाळा बंद राहणार नाही याची दक्षता घेण्यास सांगण्यात आले आहे. राज्यातील सर्व शाळांनी शासनाच्या सूचनांचे पालन करून विद्यार्थ्यांचे अध्यापन नियमित सुरू ठेवावे, असे आवाहन शिक्षण संचालकांनी केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai University Exam New Rule : लेट लतीफ विद्यार्थ्यांना बसणार दणका; परीक्षेच्या ३० मिनिटे आधी हजेरी बंधनकारक

- मुंबई विद्यापीठाचा विद्यार्थ्यांसाठी नवा नियम मुंबई : मुंबई विद्यापीठ आणि त्यांच्याशी संलग्न सर्व

Arjun Tendulkar Wife Saaniya Chandhok : सचिन तेंडुलकर यांची सुनबाई झाली 'प्राण्यांची डॉक्टर'; नणंद साराची प्रतिक्रिया चर्चेत

क्रिकेट जगतातील दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर (Sachin Tendulkar) यांच्या घरात पुन्हा एकदा आनंदाची बातमी समोर आली आहे. सचिन

Georgis Gor, Devendra Fadnavis : महाराष्ट्र दोन कारणांमुळे जगाच्या नकाशावर, मुंबई आणि मुख्यमंत्री फडणवीस!

- अमेरिकेचे राजदूत जॉर्जिस गोर यांच्याकडून कौतुक; महाराष्ट्राचे मुख्यमंत्री डायनॅमिक, एनर्जेटिक आणि कामाची

Sunetra Pawar : पिंपळवंडीतील बालिका अत्याचार खटला फास्ट ट्रॅक कोर्टात चालवणार

- उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार; आरोपीवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुंबई : पुणे जिल्ह्यातील जुन्नर

Kishori Pednekar : महापालिका विरोधी पक्षनेत्या गोंधळलेल्या!

- पद टिकवण्यासाठी पेडणेकरांचा केविलवाणा प्रयत्न मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेच्या विरोधी पक्षनेते

Tukaram Mundhe : तुकाराम मुंढेंच्या शिस्तीमुळे नगरसेवक राहिले उपाशी

- सभागृहात उपहारगृह बंदीवरून तीव्र नाराजीचे उमटले सूर मुंबई (विशेष प्रतिनिधी) मुंबई महापालिकेतील उपहारगृहात