मुंबई : मध्य रेल्वेने लोकमान्य टिळक टर्मिनस आणि हुजूर साहेब नांदेड दरम्यान नियमितपणे चालणाऱ्या २ साप्ताहिक गाड्या सुरू केल्या आहेत. दिनांक ६ जुलै २०२६ रोजी महाराष्ट्र आणि उत्तराखंडचे माननीय मुख्यमंत्री, माननीय रेल्वे मंत्री आणि इतर मान्यवरांच्या हस्ते या दोन गाड्यांचे हिरवा झेंडा दाखवून उद्घाटन करण्यात आले. (Mumbai-Nanded Weekly Trains)
लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) एक्सप्रेसची नियमित सेवा खालीलप्रमाणे सुरू होईल:
* गाडी क्रमांक 17667 हुजूर साहेब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक ०८.०७.२०२६ पासून * गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक ०९.०७.२०२६ पासून * गाडी क्रमांक 17665 हुजूर साहेब नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस एक्सप्रेस दिनांक १३.०७.२०२६ पासून आणि * गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - हुजूर साहेब नांदेड एक्सप्रेस दिनांक १४.०७.२०२६ पासून सुरू होईल. (Mumbai-Nanded Weekly Trains)
नियमित फेऱ्यांचा तपशील खालीलप्रमाणे आहे:
(अ) गाडी क्रमांक 17668 / 17667 लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस (मुंबई) साप्ताहिक एक्सप्रेस: गाडी क्रमांक 17668 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक ०९.०७.२०२६ पासून दर गुरुवारी १६.५५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. गाडी क्रमांक 17667 नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक ०८.०७.२०२६ पासून दर बुधवारी २१.१५ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.०० वाजता पोहोचेल. (Mumbai-Nanded Weekly Trains)
थांबे: कल्याण, नाशिक रोड, मनमाड, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा.
(ब) गाडी क्रमांक 17666 / 17665 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस:
गाडी क्रमांक 17666 लोकमान्य टिळक टर्मिनस - नांदेड साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १४.०७.२०२६ पासून दर मंगळवारी १६.३५ वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस येथून सुटेल आणि हुजूर साहेब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी ०९.१० वाजता पोहोचेल. (Mumbai-Nanded Weekly Trains)
गाडी क्रमांक 17665 नांदेड - लोकमान्य टिळक टर्मिनस साप्ताहिक एक्सप्रेस दिनांक १३.०७.२०२६ पासून दर सोमवारी २१.१५ वाजता हुजूर साहेब नांदेड येथून सुटेल आणि लोकमान्य टिळक टर्मिनस येथे दुसऱ्या दिवशी १३.४० वाजता पोहोचेल.
थांबे: कल्याण, इगतपुरी, नाशिक रोड, मनमाड, चाळीसगाव, भुसावळ, मलकापूर, अकोला, वाशिम, हिंगोली डेक्कन, बसमत आणि पूर्णा.
दोन्ही गाड्यांची संरचना: १ वातानुकूलित प्रथम श्रेणी, २ वातानुकूलित द्वितीय, ६ वातानुकूलित तृतीय, ७ शयनयान, ४ सामान्य द्वितीय श्रेणी, १ जनरेटर व्हॅन आणि १ द्वितीय आसनासह गार्ड्स ब्रेक व्हॅन.
आरक्षण: गाडी क्रमांक 17666 आणि गाडी क्रमांक 17668 साठी आरक्षण दिनांक ०८.०७.२०२६ रोजी सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि http://www.irctc.co.in या संकेतस्थळावर सुरू होईल. प्रवासी तिकीट आरक्षणासाठी 'रेलवन' ॲप देखील डाउनलोड करू शकतात. या गाड्यांच्या थांब्यांवरील सविस्तर वेळेसाठी, कृपया www.enquiry.indianrail.gov.in ला भेट द्या किंवा NTES ॲप डाउनलोड करा. (Mumbai-Nanded Weekly Trains)






