Monday, July 6, 2026

Ajit Pawar Birth Anniversary : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात 'जनसेवा सप्ताह'

Ajit Pawar Birth Anniversary : अजित पवारांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादीच्या वतीने राज्यभरात 'जनसेवा सप्ताह'

- प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांची माहिती; २२ ते २६ जुलै या कालावधीत आयोजन

मुंबई : दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे (Ajit Pawar Birth Anniversary) औचित्य साधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने राज्यभरात २२ ते २६ जुलै या कालावधीत 'जनसेवा सप्ताहा'चे आयोजन करण्यात आले आहे. दिलेला शब्द पाळणारे, अथक परिश्रम आणि अफाट निर्णयक्षमतेच्या जोरावर महाराष्ट्राच्या कृषी, सहकार, पायाभूत सुविधा आणि सामाजिक विकासात आपल्या कार्याचा अभूतपूर्व ठसा उमटवणाऱ्या अजितदादांच्या स्मृती प्रित्यर्थ हा लोककल्याणकारी उपक्रम राबवण्यात येणार असल्याची माहिती प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी सोमवारी दिली.

या जनसेवा सप्ताहाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धन, आरोग्य, महिला सक्षमीकरण, कृषी आणि युवा विकासाला चालना देणारे विविध राज्यव्यापी उपक्रम एकाच वेळी राबवले जाणार आहेत. अजितदादांनी (Ajit Pawar Birth Anniversary) नेहमीच पर्यावरण आणि वृक्ष संवर्धनावर विशेष भर दिला होता. हेच ध्यानात घेऊन या सप्ताहात 'हरित महाराष्ट्र, वृक्ष माझी सावली, वृक्ष माझी माऊली' आणि 'दादांची दृष्टी, हरित सृष्टी' या संकल्पनेवर आधारित व्यापक वृक्षारोपण मोहीम राबवली जाईल. विशेष म्हणजे, ज्येष्ठ अभिनेते सयाजी शिंदे यांच्या नेतृत्वाखालील 'सह्याद्री देवराई फाऊंडेशन'च्या सहकार्याने राज्यभरात 'देवगिरी ते देवराई' हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबवला जाणार असून, पक्षाच्या सर्व आजी-माजी खासदारांना आणि आमदारांना आपापल्या मतदारसंघात प्रत्येकी एक 'देवराई' उभारण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

आरोग्य क्षेत्रातही या सप्ताहादरम्यान मोठे काम केले जाणार असून, राज्यभरात भव्य रक्तदान शिबिरे घेऊन रक्तसाठा वाढवण्यासाठी विशेष प्रयत्न केले जातील. ग्रामीण व शहरी भागात मोफत आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबिरांचे आयोजन करून मधुमेह, रक्तदाब व नेत्रतपासणी केली जाईल. महिलांसाठी स्तन व गर्भाशय कर्करोग तपासणी, सर्वांसाठी मुख कर्करोग तपासणी व समुपदेशन आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी ऑस्टिओपोरोसिस निदान शिबिरे घेतली जातील. अजितदादांच्या (Ajit Pawar Birth Anniversary) शिस्तप्रिय आणि स्वच्छतेच्या आवडीला उजाळा देण्यासाठी राज्यभरात गडकिल्ले, महापुरुषांची स्मारके आणि एसटी बस स्थानकांवर सार्वजनिक स्वच्छता मोहीम राबवली जाईल, तसेच आषाढी वारीतील वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष उपक्रम चालवले जातील.

अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार :

महिला सक्षमीकरणाच्या दृष्टीने बचत गटांचे आर्थिक सक्षमीकरण, स्वयंरोजगार, सूक्ष्म कर्ज आणि स्थानिक स्वराज्य संस्थांमधील नेतृत्वासाठी मार्गदर्शन मेळावे आयोजित केले जाणार असून, पक्षाच्या महिला आघाडीतर्फे 'अजितदादा महिला सशक्तिकरण पुरस्कार' आणि शेतकरी महिलांचा विशेष सन्मान केला जाईल. शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचा (एआय) वापर करण्यावर दादांचा नेहमीच आग्रह असायचा, यामुळे या सप्ताहात एआय तंत्रज्ञानावर आधारित कार्यशाळा, कृषी प्रदर्शने आणि शेतकरी समुपदेशन मेळावे आयोजित करून प्रगतशील शेतकऱ्यांना 'अजितदादा कृषी सन्मान पुरस्कार' दिला जाईल. (Ajit Pawar Birth Anniversary)

निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळा घेणार :

पक्षाच्या तरुण कार्यकर्त्यांना नेतृत्वासाठी तयार करण्यासाठी मुंबई, पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर आणि नाशिक या प्रमुख शहरांमध्ये 'युवा संकल्प शिबिरे' व निवडणूक प्रशिक्षण कार्यशाळा घेतल्या जातील, (Ajit Pawar Birth Anniversary) तसेच नामवंत आजी-माजी खेळाडूंचा क्रीडा सन्मान केला जाईल. यासोबतच, अल्पसंख्याक समाजासाठी दादांनी सुरू केलेल्या विविध योजनांचा लाभ तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी 'अल्पसंख्याक सेवा संकल्प शिबिरे' आयोजित केली जातील. या संपूर्ण जनसेवा सप्ताहाच्या नियोजनाची व यशस्वीतेची मुख्य जबाबदारी संबंधित जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संपर्कमंत्र्यांवर सोपवण्यात आली असून, त्यांनी फ्रंटल, सेल आणि तालुका पातळीवरील सर्व पदाधिकाऱ्यांच्या बैठका घेऊन हा सप्ताह यशस्वी करावा, असे आदेश खासदार सुनील तटकरे (MP Sunil Tatkare) यांनी दिले आहेत.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >