Sunday, July 5, 2026

Bhondu Baba Manohar Bhosale : 'बाळूमामाचा अवतार' म्हणवणाऱ्या भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यावर गंभीर आरोप! महिलेवर लैंगिक अत्याचार, आणि...

Bhondu Baba Manohar Bhosale : 'बाळूमामाचा अवतार' म्हणवणाऱ्या भोंदू बाबा मनोहर भोसले याच्यावर गंभीर आरोप! महिलेवर लैंगिक अत्याचार, आणि...

सोलापूर : स्वतःला देवाचा अवतार असल्याचा दावा करत चमत्कार आणि उपचारांच्या नावाखाली लोकांची दिशाभूल करणारा भोंदू बाबा मनोहर भोसले (Bhondu Baba Manohar Bhosale) पुन्हा एकदा गंभीर आरोपांमुळे अडचणीत सापडला आहे. आश्रमात उपचारासाठी आलेल्या एका महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचा तसेच तिच्याकडून लाखो रुपयांची आर्थिक फसवणूक केल्याचा आरोप करण्यात आला असून, याप्रकरणी करमाळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित महिलेचे दाजी गंभीर आजारी होते. विविध रुग्णालयांमध्ये उपचार करूनही प्रकृतीत अपेक्षित सुधारणा होत नव्हती. अशावेळी परिचितांच्या सल्ल्यानुसार संबंधित महिला २०२४ मध्ये मनोहर भोसलेच्या घोटी येथील आश्रमात पोहोचली. (Bhondu Baba Manohar Bhosale)

तक्रारीनुसार, "विशेष पूजा, धार्मिक विधी आणि दैवी शक्तीच्या माध्यमातून रुग्ण पूर्णपणे बरा होईल," असे आश्वासन देत मनोहर भोसले आणि त्याचा प्रमुख सहकारी म्हणून ओळखला जाणारा 'नाथबाबा' यांनी महिलेचा विश्वास संपादन केला. त्यानंतर विविध धार्मिक विधी, पूजा आणि उपचारांच्या नावाखाली टप्प्याटप्प्याने १ लाख ६४ हजार रुपये उकळल्याचा आरोप करण्यात आला आहे. (Bhondu Baba Manohar Bhosale)

याच काळात आश्रमात असताना मनोहर भोसलेने महिलेवर लैंगिक अत्याचार केल्याचाही गंभीर आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. आर्थिक फसवणूक आणि अत्याचारानंतर संबंधित महिलेने धाडसाने पोलिसांकडे धाव घेत तक्रार दाखल केली. महिलेच्या तक्रारीवरून करमाळा पोलिसांनी मनोहर भोसलेविरुद्ध लैंगिक अत्याचार, फसवणूक आणि इतर संबंधित कलमांखाली गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. पोलिसांकडून आश्रमातील आर्थिक व्यवहार, तेथील इतर व्यक्तींची भूमिका आणि अशाच प्रकारे आणखी कोणाची फसवणूक झाली आहे का, याचाही तपास केला जात आहे. (Bhondu Baba Manohar Bhosale)

दरम्यान, या घटनेमुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, अंधश्रद्धा आणि चमत्काराच्या नावाखाली नागरिकांची फसवणूक करणाऱ्या भोंदू बाबांविरोधात कठोर कारवाईची मागणी जोर धरू लागली आहे. तपासादरम्यान आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे. (Bhondu Baba Manohar Bhosale)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >