Wednesday, July 1, 2026

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

Walkeshwar Accident : वाळकेश्वरमध्ये भिंत कोसळून एकाचा मृत्यू; बाबुलनाथ रोडवरील दुर्घटना

मुंबई : वाळकेश्वर (Walkeshwar) परिसरातील बाबुलनाथ रोड (Babulnath Road) येथील सूर्यप्रकाश इमारतीत (Surya Prakash Building) मंगळवारी (३० जून) रात्री भिंत (Wall) कोसळून एकाचा मृत्यू झाला.

मुंबई अग्निशमन दलाने (Mumbai Fire Brigade - MFB) रात्री ११:२२ वाजता या घटनेची नोंद केली. तळमजला अधिक तीन मजले (G+3) असलेल्या म्हाडा सेस्ड (MHADA Cessed) इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील बाल्कनी (Balcony) लगतचा भाग कोसळल्याची माहिती आहे.

घटनेनंतर मुंबई अग्निशमन दल (Mumbai Fire Brigade - MFB), पोलीस (Police), बेस्ट (BEST), १०८ रुग्णवाहिका (108 Ambulance) आणि संबंधित विभागाचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले.

या दुर्घटनेत संतोष रामचंद्र भरास्कर (वय ५१) जखमी झाले होते. त्यांना तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, जे. जे. रुग्णालयाकडून (J J Hospital) मिळालेल्या माहितीनुसार, त्यांना रुग्णालयात आणण्यापूर्वीच मृत घोषित (Declared Brought Dead) करण्यात आले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा