BDD Chawl Parking Issue : बीडीडी चाळ पार्किंग प्रश्नावर विधानपरिषदेत सकारात्मक पाऊल!

- नायगाव आणि डिलाईल रोडच्या रहिवाशांच्या समाधानासाठी लवकरात लवकर विशेष बैठक घेणार; मंत्र्यांचे आश्वासन


मुंबई : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या पावसाळी अधिवेशनादरम्यान आज बीडीडी चाळ पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांच्या वाहन पार्किंगच्या समस्येवर (BDD Chawl Parking Issue) नियम ९३ अन्वये जोरदार चर्चा झाली. शिवसेना उबाठा पक्षाचे आमदार सुनील शिंदे यांनी या संदर्भात सूचना मांडत, वरळी येथील बीडीडी चाळ प्रकल्पाच्या धर्तीवर नायगाव, डिलाईल रोड (ना. म. जोशी मार्ग) आणि भोईवाडा येथील रहिवाशांनाही 'एकास एक' कार पार्किंगची सुविधा मिळावी, अशी मागणी सभागृहात केली. या महत्त्वपूर्ण विषयावर राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर (Minister of State Dr. Pankaj Bhoyar) यांनी शासनाची भूमिका आणि तांत्रिक बाजू सविस्तरपणे स्पष्ट केली. (BDD Chawl Parking Issue)



'प्रकल्प एकच, मग नियमांत तफावत का?' – आमदार सुनील शिंदे यांचा सवाल


नियम ९३ च्या सूचनेद्वारे सभागृहाचे लक्ष वेधताना आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) म्हणाले की, म्हाडा ही बीडीडी चाळ पुनर्विकासासाठी मुख्य नोडल एजन्सी म्हणून काम करत आहे. वरळी येथील प्रकल्पात प्रत्येक सदनिकाधारकाला 'एकास एक' पार्किंगची सुविधा देण्यात आली आहे, परंतु डिलाईल रोड आणि नायगाव येथील रहिवाशांच्या बाबतीत दोन सदनिकांमागे एक पार्किंग देण्याचे नियोजन समोर येत असल्याने त्यांच्यावर अन्याय होत आहे. डिलाईल रोड येथील रहिवाशांनी पुनर्विकासासाठी सर्वात आधी आपली घरे खाली केली होती, तसेच नायगाव आणि भोईवाडा येथील रहिवाशांच्या कार्यक्रमात खुद्द माननीय मुख्यमंत्र्यांनी 'एकास एक' पार्किंग देण्याचे आश्वासन दिले होते, याकडे त्यांनी लक्ष वेधले. 'संपूर्ण बीडीडी चाळ पुनर्विकास योजना एकच असताना सुविधांमध्ये दुजाभाव का?' असा प्रश्न उपस्थित करत त्यांनी मुंबईत शासनासाठी जागेची कमतरता असणे तांत्रिकदृष्ट्या अशक्य असल्याचे सांगितले आणि सरकारने विशेष बाब म्हणून सर्वांना समान न्याय द्यावा, अशी मागणी केली. (BDD Chawl Parking Issue)



जागेअभावी नियोजन, पण शासनाची भूमिका सकारात्मक – मंत्री डॉ. पंकज भोयार


आमदार सुनील शिंदे (MLA Sunil Shinde) यांनी उपस्थित केलेल्या या मुद्द्यावर उत्तर देताना राज्यमंत्री डॉ. पंकज भोयार यांनी शासनाची भूमिका स्पष्ट केली. मंत्री भोयार म्हणाले की, या बृहद पुनर्विकास प्रकल्पाची मूळ पायाभरणी ३० मार्च २०१६ च्या शासन निर्णयानुसार झालेली असून, रहिवाशांना सर्व सोयी-सुविधा देण्यास सरकार कटिबद्ध आहे. पार्किंगच्या मुख्य मुद्द्यावर स्पष्टीकरण देताना त्यांनी सांगितले की, विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावली (DCPR 2034) नुसार मूळ नियमात चार सदनिकांमागे एक कार पार्किंग देण्याची तरतूद आहे. मात्र, रहिवाशांची मागणी लक्षात घेऊन सरकारने आधीच ती शिथिल केली आहे. वरळी बीडीडी चाळ प्रकल्पात पुरेशी जागा उपलब्ध असल्यामुळे तिथे 'एकास एक' पार्किंग देणे शक्य झाले. परंतु, नायगाव आणि ना. म. जोशी मार्ग (डिलाईल रोड) या दोन्ही प्रकल्पांच्या ठिकाणी तितकी जागा उपलब्ध नसल्यामुळे, तिथे दोन सदनिकांमागे एक पार्किंग देण्याचे नियोजन 'शक्तीप्रदान समिती'च्या मान्यतेने करण्यात आले आहे, अशी माहिती त्यांनी दिली. (BDD Chawl Parking Issue)



सभापतींच्या मध्यस्थीनंतर संयुक्त बैठकीची घोषणा :


या चर्चेदरम्यान दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यानंतर उपसभापती सचिन अहिर यांनी या प्रकरणात महत्त्वाची मध्यस्थी केली. "संपूर्ण बीडीडी चाळ पुनर्विकासाची योजना आणि त्याचे मुख्य सक्षम प्राधिकरण एकच असताना रहिवाशांमध्ये असंतोष निर्माण होऊ नये म्हणून यावर निश्चित मार्ग काढण्याची गरज आहे," असे स्पष्ट करत उपसभापतींनी सरकारला निर्देश दिले. उपसभापतींनी आमदार सुनील शिंदे आणि इतर संबंधित स्थानिक लोकप्रतिनिधींसोबत गृहनिर्माण मंत्र्यांची एक संयुक्त बैठक आयोजित करण्याची सूचना केली, जेणेकरून यावर कायदेशीर व तांत्रिक तोडगा काढता येईल. उपसभापतींच्या या सूचनेला गृराज्यमंत्री मंत्री डॉ. पंकज भोयार यांनी तातडीने सकारात्मक प्रतिसाद दिला आणि रहिवाशांच्या समाधानासाठी लोकप्रतिनिधींसोबत लवकरात लवकर विशेष बैठक घेऊन यावर योग्य व सकारात्मक मार्ग काढला जाईल, असे आश्वासन सभागृहाला दिले. (BDD Chawl Parking Issue)

Comments
Add Comment

Nisha Bhagat Fraud Case : प्रसिद्ध मराठी लोकगायिकेविरोधात गुन्हा दाखल; सरकारी नोकरीच्या आमिषाने लाखोंची फसवणूक केल्याचा आरोप

कल्याण : प्रसिद्ध मराठी लोकगायिका निशा भगत आणि अनिल आहिरे यांच्याविरोधात सरकारी नोकरीच्या आमिषाने २० लाख रुपये

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

North Cyprus Ferry Accident : मोठी बातमी! २७० प्रवाशांना घेऊन जाणारी फेरी बोट उलटली; १०० हून अधिक जणांची सुटका, बचावकार्य सुरू

उत्तर सायप्रस : उत्तर सायप्रसच्या किनाऱ्याजवळ आज दुपारी मोठी दुर्घटना घडली. २७० प्रवाशांना घेऊन जाणारी प्रवासी

Ankit Baliyan Murder : शामलीत अंकित बलियान हत्या प्रकरणातील दोन संशयित चकमकीत ठार; पोलीस कर्मचारीही जखमी

शामली :  उत्तर प्रदेशातील शामली जिल्ह्यात हरियाणवी गायक आणि यूट्यूबर अंकित बलियान यांच्या हत्या प्रकरणातील दोन

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Maharashtra Weather Alert : महाराष्ट्रातील पावसाची प्रतीक्षा कायम; हिंगोली-नांदेडला यलो अलर्ट, हवामान विभागाचा इशारा

मुंबई : राज्यातील हवामानात सध्या चढ-उतार पाहायला मिळत आहेत. मागील काही दिवसांपासून अनेक भागांत हलका ते मध्यम पाऊस