Jalgaon Crime News : जळगाव जिल्ह्यात संतापजनक घटना समोर आली आहे. जिल्ह्यातील फत्तेपूर पोलीस ठाणे (Fatehpur Police Station) हद्दीत महिलेवर सामूहिक अत्याचार झाल्याचा प्रकार समोर आला असून आरोपींनी घटनेचे व्हिडीओ देखील मोबाईल मध्ये चित्रीकरण केले. याप्रकरणी पोलिसांनी 15 पैकी 14 सह आरोपींना अटक केली आहे. धक्कादायक म्हणजे पीडिता आणि संशयित आरोपी तरुण हे एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती समोर आली आहे.
Atacama Desert : जगभरात एका बाजूला फॅशनचा ट्रेंड दिवसेंदिवस बदलत आहे, तर दुसऱ्या बाजूला करोडो लोकांना अंग झाकण्यासाठी पुरेसे कपडेही मिळत नाहीत. या दोन्ही ...
नेमक प्रकरण काय ?
देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात 2 जून रोजी 40 वर्षीय महिला तिच्या मित्रासोबत बसली होती. दरम्यान, तिच्या मित्रासमोरच दोन आरोपींनी जबरदस्तीने तिच्यावर सामूहिक अत्याचार केला, असा आरोप आहे. या घटनेदरम्यान इतर आरोपींनी संपूर्ण प्रकाराचे चित्रीकरण मोबाईलमध्ये केले होते. त्यापैकी एका संशयिताने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला आणि गंभीर प्रकार पुन्हा चर्चेत आला. (Jalgaon Crime News )
काल पीडितेने पोलिसांमध्ये तक्रार दिल्याच्यानंतर हा खळबळजनक प्रकार समोर आला होता. या घटना प्रकरणात पोलिसांनी 15 पैकी 14 आरोपींना अटक केली आहे. तर एक जण फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहे. देऊळगाव-कापूसवाडी रस्त्यावरील ठांबरडा नाल्याजवळील निर्जन जंगल परिसरात 2 जून रोजी 40 वर्षीय विवाहित महिला तिच्या मित्रासह फिरायला गेली होती,यावेळी लाकूड तोडीसाठी जंगलात फिरत असलेल्या तरुणांना पीडित महिला एका तरुणाच्या सोबत आढळून आली.यावेळी काही तरुणांनी तिला आणि तिच्या सोबतच्या तरुणाला धमक्या देत महिलेवर मित्रासमोरच दोन आरोपींनी जबरदस्तीने सामूहिक बलात्कार केल्याची तक्रार पीडितेचे पोलिसात केली आहे. (Jalgaon Crime News )
Nashik : काँक्रिटीकरणाचा वेग आणि हवामानातील सातत्याने होणार बदल यामुळे निर्माण होणाऱ्या 'अर्बन हीट आयलंड'च्या संकटावर मात करण्यासाठी नाशिक महानगरपालिका ...
फरार आरोपीचा शोध सुरू
या प्रकरणात भारतीय न्याय संहिता कलम 70(1), 77 तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम 66 व 67 अंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला आहे. तर फरार आरोपीचा शोध सुरू आहे. सदर घटनेतील बलात्कार करणाऱ्या दोघा आरोपींपैकी एक प्रमुख आरोपी फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. पीडिता आणि संशयित आरोपी तरुण हे एकमेकांच्या परिचयातील असल्याची माहिती पोलिस सूत्रांनी दिली आहे.






