विधानपरिषदेत शिक्षणमंत्री दादा भुसे यांचे महत्त्वपूर्ण निवेदन
मुंबई : महाराष्ट्र राज्य शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) २०२६ (TET Exam) च्या पेपरफुटीचा प्रयत्न उघडकीस येताच, महायुती सरकारने तातडीने आणि अत्यंत कठोर पावले उचलली आहेत. या गैरप्रकारात सामील असलेल्या दोषींवर संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्यांतर्गत (मकोका) कारवाई करण्यासाठी आवश्यक त्या कायदेशीर बदलांची चाचपणी केली जाईल, अशी ग्वाही शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी आज विधानपरिषदेत दिली.
याशिवाय, भविष्यात अशा घटनांना पूर्णपणे आळा घालण्यासाठी पुढील वर्षापासून टीईटीसह सर्व परीक्षा पूर्णपणे पारदर्शक आणि शिस्तबद्ध पद्धतीने ऑनलाईन घेण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती नेमण्यात येत असल्याची घोषणाही त्यांनी केली.
- आमदार निलेश राणे यांची विधानसभेत मागणी; ३३४ कोटींच्या मदतीसाठी मानले मुख्यमंत्री, कृषी मंत्री आणि पालकमंत्र्यांचे आभार मुंबई : "कोकणातील आंबा आणि ...
विधानपरिषदेत सदस्यांनी या संवेदनशील विषयावर प्रश्न उपस्थित करत दोषींवर कडक कारवाई करण्याची मागणी केली. त्यावर, विद्यार्थ्यांच्या हितासाठी सरकार आधीपासूनच किती सतर्क आहे, हे स्पष्ट करत शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी सविस्तर निवेदन सादर केले. त्यांनी सभागृहाला आश्वस्त केले की, सरकार अशा प्रवृत्तींना अजिबात पाठीशी घालणार नाही.
गृहविभाग आणि पोलिसांची तत्पर कारवाई
२८ जून २०२६ रोजी होणाऱ्या टीईटी परीक्षेची प्रश्नपत्रिका विक्रीसाठी उपलब्ध असल्याची गोपनीय माहिती पोलिसांना २७ जून रोजीच मिळाली होती. माहिती मिळताच पोलिसांनी कोणतीही दिरंगाई न करता सापळा रचला आणि तिघांना रंगेहात ताब्यात घेतले. त्यांच्याकडून जप्त केलेली प्रश्नपत्रिका ही नियोजित परीक्षेचीच असल्याची खातरजमा शिक्षण विभागाच्या अधिकाऱ्यांनी केली. सरकारने त्वरित पावले उचलल्यामुळेच हा मोठा गैरप्रकार वेळीच उघडकीस आला."
मुंबई: मुंबईतील (Mumbai) मोहरम मिरवणुकीदरम्यान विषारी कॅप्सूल वाटप (Poison Capsule Case) करण्याच्या संशयित कटाचा मुंबई पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या प्रकरणात ...
गुन्हेगारांवर कठोर कलमांनुसार गुन्हा दाखल
या प्रकरणी कोनगाव पोलीस ठाण्यात तात्काळ गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपींवर भारतीय न्याय संहिता (BNS) तसेच स्पर्धा परीक्षा आणि परीक्षांमधील गैरप्रकार प्रतिबंधक कायद्यांतर्गत अत्यंत कडक कारवाई करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले तिन्ही आरोपी सध्या पोलीस कोठडीत असून, त्यांच्याकडून कसून चौकशी सुरू आहे. या प्रकरणाचे गांभीर्य ओळखून सरकारने तात्काळ पोलीस महासंचालकांच्या (DGP) आदेशानुसार या प्रकरणाचा तपास ठाणे शहर पोलिसांच्या विशेष तपास पथकाकडे (SIT) सोपवला आहे. या रॅकेटची पाळेमुळे खणून काढण्यासाठी बिहार, हरियाणा आणि दिल्ली येथे स्वतंत्र पोलीस पथके रवाना करण्यात आली आहेत.
सरकारच्या पुढील उपाययोजनाही जाहीर
टीईटीची फेरपरीक्षा पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात घेतली जाईल.
फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतेही परीक्षा शुल्क आकारले जाणार नाही.
पुढील वर्षापासून टीईटी आणि इतर परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उभारण्याचा आराखडा तयार केला जाईल.





