भरधाव दुचाकीची शाळकरी मुलीला जोरदार धडक
School Student Accident : बीड: बीड (Beed) जिल्ह्यातील गया नगर परिसरात शाळेतून घरी परतणाऱ्या एका ९ वर्षीय विद्यार्थिनीला भरधाव दुचाकीने धडक दिल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या अपघातात (Accident) मुलगी गंभीर जखमी झाली असून तिच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.
माहितीनुसार, अभिज्ञा मडीवाले ही इयत्ता दुसरीत शिकणारी विद्यार्थिनी शाळेच्या बसमधून उतरून रस्ता ओलांडत होती. त्याचवेळी वेगाने आलेल्या दुचाकीने तिला जोरदार धडक दिली. धडकेनंतर मुलगी रस्त्यावर कोसळली.
अमरावती : समृद्धी महामार्गावरील अपघातांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. महामार्ग जेवढा सोईस्कर आणि सुखकर आहे तेवढाच जास्त तो घातक ठरत आहे. गेल्या ...
घटनेनंतर दुचाकीस्वार न थांबता तेथून निघून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे. अपघात पाहताच परिसरातील नागरिक आणि शाळेच्या बसमधील कर्मचारी तातडीने मदतीसाठी धावले. त्यांनी जखमी मुलीला जवळच्या रुग्णालयात दाखल केले.
घटनेची माहिती मिळताच जिल्हा वाहतूक शाखेचे प्रभारी पोलीस निरीक्षक वैभव पाटील, पोलीस उपनिरीक्षक विजय जाधर आणि त्यांचे पथक रुग्णालयात पोहोचले. पोलिसांनी घटनेची माहिती घेत पुढील तपास सुरू केला आहे.
या घटनेनंतर पोलीस निरीक्षक वैभव पाटील यांनी शाळा बसमधून उतरणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत महत्त्वाचे निर्देश दिले आहेत. विद्यार्थ्यांना सुरक्षितपणे घरी पोहोचवण्याची जबाबदारी बस चालक आणि कर्मचाऱ्यांची असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्ह्यातील सर्व शाळांना सूचना देण्यात येणार असून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कारवाई केली जाईल. तसेच शाळा व्यवस्थापनासोबत वाहतूक सुरक्षेबाबत बैठकही घेण्यात येणार आहे.
मुलाचे करियर वाचण्यासाठी उद्धव ठाकरेंची धावपळ सुरू शिवसेना सचिव किरण पावसकर यांची खरमरीत टीका मुंबई : शिवसेनेत प्रवेश केलेल्या ...
या अपघातानंतर शाळा बस थांब्यांजवळील वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सोशल मीडियावर अनेकांनी या घटनेबद्दल चिंता व्यक्त करत जखमी मुलगी लवकर बरी व्हावी, अशी प्रार्थना केली आहे.




