एसटीतील सवलतीसाठी १ ऑगस्टपासून 'एनसीएमसी' बंधनकारक
मुंबई : राज्य मार्ग परिवहन (ST) महामंडळाच्या बसमधील सवलतीच्या प्रवासासाठी १ ऑगस्टपासून नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड (NCMP) अनिवार्य करण्यात आले आहे, महिला, ज्येष्ठ नागरिक आणि अमृत ज्येष्ठ नागरिकांना सुरुवातीला ही अट लागू होणार असून, पुढील टप्प्यात विद्यार्थी, दिव्यांग, पुरस्कारार्थी यांच्यासह सर्व सवलतधारक प्रवाशांनाही हे कार्ड बंधनकारक केले जाणार आहे.
Mumbai : नाशिकच्या मुंबई-आग्रा महामार्गावर शुक्रवारी सायंकाळी झालेल्या एका भीषण अपघातात पती-पत्नीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ ...
एसटी महामंडळाकडून सध्या सुमारे ३५ प्रकारच्या प्रवाशांना विविध सवलती दिल्या जातात. मात्र, काही ठिकाणी खोटी ओळखपत्रे आणि बनावट कागदपत्रांच्या आधारे सवलतीचा गैरवापर होत असल्याचे निदर्शनास आले होते. त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनाच सवलत मिळावी, व्यवहारांमध्ये पारदर्शकता यावी आणि रोखविरहित व्यवस्था सक्षम व्हावी, यासाठी एनसीएमसी स्मार्ट कार्डची अंमलबजावणी करण्यात आली आहे.
नवी दिल्ली : भारताच्या सीमेलगत असलेला देश म्हणजे अफगाणिस्तान. शनिवारी सायंकाळी 7:04 वाजता अचानक 6.2 तीव्रतेचा शक्तिशाली भूकंप रिश्टर स्केलवर झाला. या ...
महामंडळाच्या माहितीनुसार, राज्यभरात आतापर्यंत ५१ लाखांहून अधिक प्रवाशांची नोंदणी पूर्ण झाली असून, त्यापैकी २५ लाख कार्ड कार्यान्वित केली आहेत. प्रवाशांच्या सोयीसाठी राज्यभरात चार हजारांहून अधिक अधिकृत एजंट नियुक्त करण्यात आले आहेत. निर्धारित शुल्कापेक्षा जास्त दराने कार्ड विक्री करणाऱ्या केंद्राचा परवाना रद्द करण्याचा इशाराही एसटी महामंडळाने दिला आहे.
कुठे व कसे मिळेल कार्ड ?
१ ) बसस्थानकांवरच नोंदणीची सुविधा उपलब्ध, नवीन एनसीएमसी कार्डसाठी १९९ रुपये शुल्क. २) जुने कार्ड परत केल्यास १४९ रुपयांत नवीन कार्ड. ३) कार्डमध्ये किमान १०० रुपये शिल्लक असणे आवश्यक. ४) ५० रुपयांच्या पटीत रिचार्ज करता येणार. ५) ईटीआयएम मशिन, अधिकृत संकेतस्थळ, अॅप किंवा अधिकृत एजंटमार्फत रिचार्जची सुविधा उपलब्ध






