BMC News : बांधकामाच्या ठिकाणी असलेली झाडे वाचवणे संबंधित विकासकाची जबाबदारी

लिकिंग रोडवरील झाड दुघर्टनेप्रकरणी महापालिकेत चर्चा


दुघर्टनेला विकासकच जबाबदार, प्रशासनाचा दावा


मुंबई : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या झाडांना वाचवणे हे संबंधित विकासकाचीच जबाबदारी असून लिंकींग रोडवरील झाड उन्मळून झालेल्या दुघर्टनेला संबंधित विकासकच जबाबदार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित विकासकाच्या बांधकामाला थांबवण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.


मुंबई महापालिका (BMC) सभागृहात लिकिंग रोडवरील झाड उन्मळून (Tree Collapse) झालेल्या दुघर्टनेत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे, तर एका मुलीची परिस्थिती गंभीर आहे असे स्पष्ट करत उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी ६६ ब अन्वये चर्चा घडवून आणून खासगी जागांवरील वृक्ष संवर्धनाकरता प्रमाणित संचालन प्रक्रिया एसओपी तयार करून ती बंधनकारक करण्याची मागणी त्यांनी केली. बांधकाम स्थळांवरील झाडांचे योग्य संरक्षण व देखभाल करण्यात संबंधित विकासकाने दाखवलेल्या अक्षम्य निष्काळजीपणा हा अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगितले.



बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी म्हाडा, एसआरए (SRA) यांना बांधकाम करता महापालिकेची परवानगी घ्यावी अशी सूचना केली. आणि हे त्यांना बंधनकारक करावे. तसेच झाडामुळे ज्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि जी मुलगी जखमी झाली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या आहेत,असे सांगितले. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी मुंबईत ४५ हजार सोसायटी असून त्यात १५ हजार प्रायव्हेट सोसायटी आहेत. त्यामुळे यामध्ये प्रत्येक सोसायटीने दोन जरी झाडे लावली तरी एक लाख झाडे लागली जावू शकतो.


यावर प्रशासनाच्यावतीने निवेदन करताना अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी या प्रकरणात विकासकाचे हलगर्जीपणा असल्याचे नमुद केले. दुघर्टना घडली तिथे झाडांच्या मुळाशी बांधकामाचा ढिगारा होता. हा अतिरिक्त भार असह्य झाल्यामुळे मुळासकट झाड उन्मळून पडले. याप्रकरणी पोलिस कारवाई करता उद्यान विभागाच्या तक्रारीनुसार विकास ब्लूस्टोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना काम थांबवण्याची सूचना एसआरएला केल्यानंतर त्यांनी विकासकाला नोटीस बजावली आहे.



या संबंधित विकासकाने वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बांधकाम स्थळाच्या ठिकाणी असलेल्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे. त्यामुळे पाणी विक्ासकाची असेल, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल. या मृत मुलीला तसेच जखमी मुलीला नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला १ लाख रुपये आणि जखमीला ५० लाखरुपये विशेष बाब म्हणून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या प्रक्रियेत आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा