लिकिंग रोडवरील झाड दुघर्टनेप्रकरणी महापालिकेत चर्चा
दुघर्टनेला विकासकच जबाबदार, प्रशासनाचा दावा
मुंबई : मुंबईतील बांधकामांच्या ठिकाणी असलेल्या झाडांना वाचवणे हे संबंधित विकासकाचीच जबाबदारी असून लिंकींग रोडवरील झाड उन्मळून झालेल्या दुघर्टनेला संबंधित विकासकच जबाबदार असल्याचे महापालिका प्रशासनाने स्पष्ट केले. त्यामुळे संबंधित विकासकाच्या बांधकामाला थांबवण्याचे आदेश जारी करण्यात आल्याचेही प्रशासनाने स्पष्ट केले.
मुंबई महापालिका (BMC) सभागृहात लिकिंग रोडवरील झाड उन्मळून (Tree Collapse) झालेल्या दुघर्टनेत १५ वर्षीय मुलीचा मृत्यू झाला आहे, तर एका मुलीची परिस्थिती गंभीर आहे असे स्पष्ट करत उबाठाचे नगरसेवक अंकित प्रभू यांनी ६६ ब अन्वये चर्चा घडवून आणून खासगी जागांवरील वृक्ष संवर्धनाकरता प्रमाणित संचालन प्रक्रिया एसओपी तयार करून ती बंधनकारक करण्याची मागणी त्यांनी केली. बांधकाम स्थळांवरील झाडांचे योग्य संरक्षण व देखभाल करण्यात संबंधित विकासकाने दाखवलेल्या अक्षम्य निष्काळजीपणा हा अपघाताला कारणीभूत असल्याचे सांगितले.
दरवर्षी अंदाजे १.२४ लाख युनिट वीज निर्मिती मुंबई : मुलुंड (पूर्व) मधील डॉ. चिंतामणराव द्वारकानाथ देशमुख उद्यान तसेच डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम मनोरंजन ...
बाजार व उद्यान समिती अध्यक्ष हेतल गाला यांनी म्हाडा, एसआरए (SRA) यांना बांधकाम करता महापालिकेची परवानगी घ्यावी अशी सूचना केली. आणि हे त्यांना बंधनकारक करावे. तसेच झाडामुळे ज्या मुलीचा मृत्यू झाला आहे आणि जी मुलगी जखमी झाली आहे त्यांना नुकसान भरपाई देण्याच्या सूचना केल्या आहेत,असे सांगितले. यावर सभागृहनेते गणेश खणकर यांनी मुंबईत ४५ हजार सोसायटी असून त्यात १५ हजार प्रायव्हेट सोसायटी आहेत. त्यामुळे यामध्ये प्रत्येक सोसायटीने दोन जरी झाडे लावली तरी एक लाख झाडे लागली जावू शकतो.
यावर प्रशासनाच्यावतीने निवेदन करताना अतिरिक्त आयुक्त प्राजक्ता लवंगारे यांनी या प्रकरणात विकासकाचे हलगर्जीपणा असल्याचे नमुद केले. दुघर्टना घडली तिथे झाडांच्या मुळाशी बांधकामाचा ढिगारा होता. हा अतिरिक्त भार असह्य झाल्यामुळे मुळासकट झाड उन्मळून पडले. याप्रकरणी पोलिस कारवाई करता उद्यान विभागाच्या तक्रारीनुसार विकास ब्लूस्टोन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीविरोधात २०२३ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यांना काम थांबवण्याची सूचना एसआरएला केल्यानंतर त्यांनी विकासकाला नोटीस बजावली आहे.
स्थायी समितीने प्रस्तावाला दिली मंजुरी मागील पाच वर्षांपासून कंत्राटदाराने थांबवले होते काम महापालिकेने नव्याने नेमला कंत्राटदार मुंबई : परळमधील ...
या संबंधित विकासकाने वृक्ष प्राधिकरणाची परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे बांधकाम स्थळाच्या ठिकाणी असलेल्या झाडांची काळजी घेण्याची जबाबदारी संबंधित विकासकाची आहे. त्यामुळे पाणी विक्ासकाची असेल, प्रशासनाकडून योग्य ती कारवाई केली जाईल. या मृत मुलीला तसेच जखमी मुलीला नुकसान भरपाई देण्याची शिफारस केली आहे. त्यानुसार मृत व्यक्तीच्या नातेवाईकाला १ लाख रुपये आणि जखमीला ५० लाखरुपये विशेष बाब म्हणून देण्याचा प्रस्ताव प्रशासनाच्या प्रक्रियेत आहे.




