Rahul Narwekar : लोकलमधील हत्येचे विधानसभेत तीव्र पडसाद; सोमवारपर्यंत निवेदन सादर करण्याचे विधानसभा अध्यक्षांचे निर्देश

मुंबई : मुसळधार पावसात लोकलचा दरवाजा बंद करण्याच्या वादातून बुधवारी झालेल्या हत्या प्रकरणाने संपूर्ण राज्य हादरले असताना गुरुवारी विधानसभेत त्याचे तीव्र पडसाद उमटले. या प्रकरणी येत्या सोमवारपर्यंत निवेदन सादर करण्याचे निर्देश विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी शासनाला दिले.



उबाठा गटाचे आ. भास्कर जाधव, काँग्रेस आ. नाना पटोले यांच्यासह इतर सदस्यांनी या विषयावर स्थगन प्रस्ताव मांडला होता. यावेळी बोलताना नाना पटोले म्हणाले की, “काल मुंबईच्या लोकलमध्ये घडलेली घटना संपूर्ण महाराष्ट्रालाच नव्हे तर, देशाला हादरवून गेली. सर्वसामान्य लोकांनी जगावे की, नाही, अशी परिस्थिती आहे. प्रवाशी रेल्वे स्थानकात जातात तेव्हा सुरक्षेसाठी तिथे त्यांची स्कॅनिंग होते. मी आज सकाळी मुद्दाम ती स्कॅनिंगची पद्धत बघायला गेलो. पण ते फक्त दिखावे असून तिथे कुठलेही स्कॅनिंग होत नाही. २६/११ ची घटना आपल्या सर्वांनाच माहिती आहे. सर्वसामान्य माणूस रेल्वेने प्रवास करतो, अशावेळी त्याच्या सुरक्षेसाठी कुठली व्यवस्था नसल्यास ही गंभीर बाब आहे.”



यावर बोलताना विधानसभा अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर म्हणाले की, “सदस्यांनी मांडलेला हा स्थगन प्रस्ताव अत्यंत गंभीर स्वरुपाचा आहे. मुंबईसारख्या शहरात हजारोंच्या संख्येने लोक असलेल्या रेल्वे स्थानकात भरदिवसा कुणाचा खून होत असल्यास ती अत्यंत गंभीर बाब आहे. रेल्वे स्थानकांचे नियंत्रण रेल्वेकडे असले तरी त्या स्थानकावरील कायदा-सुव्यवस्थेची जबाबदारी पूर्णपणे महाराष्ट्र शासनाची आहे. त्यासाठी शासनाचे रेल्वे सुरक्षा दल आहे. त्यात वरिष्ठ आयपीएस अधिकाऱ्यांची नियुक्ती झाली आहे. असे असतानाही मुंबई शहरात अशी गंभीर घटना होत असल्यास ते खेदजनक आहे. शासनाने यासंदर्भात त्वरित उपाययोजना करावी. तसेच सोमवारी सायंकाळपर्यंत सभागृहात यासंदर्भातील निवेदन करावे,” असे आदेश त्यांनी दिले.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Panvel ATM Fraud : पनवेलमध्ये ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपये लंपास

पनवेल : पनवेल शहरात ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचं