सांगली : सांगली (Sangli) जिल्ह्यातील काडेगाव तालुक्यातील काडेपूर गावात बुधवारी एक धक्कादायक घटना घडली. कराड (Karad) शहर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या २५ वर्षीय पोलीस हवालदाराने आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे पोलीस दलासह परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Sangli Police Constable Suicide)
मृत पोलीस हवालदाराचे नाव आशुतोष अजित माने (Ashutosh Mane) असे असून ते कराड शहर पोलीस ठाण्यात पोलीस कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत होते. त्यांच्या शांत, मनमिळाऊ आणि कर्तव्यदक्ष स्वभावामुळे ते सहकारी व मित्रपरिवारात लोकप्रिय होते.
सोनं-चांदी (Gold Rate Today) खरेदी करणाऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. जळगावच्या सुवर्णनगरीत आज सराफा बाजार उघडताच सोने आणि चांदीच्या दरांमध्ये मोठी ...
नेमकं काय घडलं ?
मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी आशुतोष माने यांनी काडेगाव येथील त्यांच्या राहत्या घराजवळ असलेल्या गोठ्यात आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच कुटुंबीय आणि स्थानिकांनी त्यांना तातडीने कडेगाव ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. मात्र, वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्यांना मृत घोषित केले.
घटनेची माहिती मिळताच कडेगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आणि आवश्यक कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केली. आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप समोर आलेले नसून पोलीस विविध अंगांनी तपास करत आहेत.
Chalisgaon Crime : गुन्हेगारांचे कंबरडे मोडण्यासाठी पोलीस यंत्रणा अॅक्शन मोडवर आली आहे. चाळीसगावात पोलीसांनी आज बुधवारी भल्यापहाटेच साखर झोपेत असलेल्या ...
या दुर्दैवी घटनेमुळे पोलीस दलावर शोककळा पसरली असून सहकाऱ्यांनी आशुतोष माने यांच्या निधनाबद्दल दुःख व्यक्त केले आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रवीण जाधव करत आहेत.






