Nashik : महापालिकेच्या शिबिरात लस घेतली अन्...; 17 वर्षीय श्रावणीच्या मृत्यूने शहरात खळबळ

Nashik News: नाशिक शहरात घडलेल्या एका घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडवली आहे. नाशिकच्या खुटवडनगर परिसरात महापालिकेच्या (Municipal Corporation) वतीने लसीकरण शिबिर (Vaccination Camp) आयोजित केले होते. या नियमित लसीकरण शिबिरात लस घेतल्यानंतर अवघ्या काही वेळातच एका 17 वर्षीय मुलीचा अचानक चक्कर येऊन कोसळल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना बुधवारी घडली असून शहरात खळबळ उडाली आहे.


श्रावणी अनिल पाटील (Shravani Anil Patil) असे मयत मुलीचे नाव आहे. श्रावणीच्या मृत्यूनंतर हा मृत्यू लसीकरणाच्या रिॲक्शनमुळे झाला की यामागे आणखी कुठले कारण आहे यावर मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.



'त्या' शिबिरात नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार, खुटवडनगर परिसरातील संकटमोचन हनुमान मंदिर येथे महापालिकेच्या वतीने नियमित लसीकरण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. धनुर्वात आणि घटसर्प प्रतिबंधक लस या शिबिरात दिली जात होती. श्रावणी पाटील ही देखील तिच्या वडिलांसोबत शिबिरात आली होती. माहितीनुसार, सर्पदंश व श्वानदंश प्रतिबंधक लस (Preventive vaccine) घेण्यासाठी श्रावणी तिथे आल्याची प्राथमिक माहिती आहे.


लस टोचल्यानंतर काही मिनिटांतच श्रावणी जवळच असलेल्या एका मेडिकल दुकानाकडे जात असताना अचानक तिला तीव्र चक्कर आली आणि ती भर रस्त्यावर कोसळली. रस्त्यावर कोसळताना तिच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याचे प्रत्यक्षदर्शींकडून सांगण्यात आले आहे. घडलेला प्रकार बघताच तिथे उपस्थित नागरिकांनी आणि तिच्या वडिलांनी तातडीने श्रावणीला जिल्हा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी नेले. मात्र, तिथल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी (Medical Officers) तपासणी केल्यानंतर तिला दाखल करण्यापूर्वीच मृत घोषित केले. या घटनेमुळे कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.



सखोल चौकशीची व्हावी


लसीकरणानंतर अवघ्या काही मिनिटांतच या मुलीचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून या प्रकरणाची सखोल चौकशीची व्हावी अशी मागणी तीव्र जोर धरत आहे. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलिसांनी तात्काळ घटनास्थळाचा पंचनामा केला आहे. हा मृत्यू लसीच्या रिॲक्शनमुळे झाला, की रस्त्यावर पडल्याने डोक्याला लागलेल्या अंतर्गत मारामुळे झाला, की यामागे आणखी काही वैद्यकीय कारण आहे? याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे.


दरम्यान ही बातमी वाऱ्यासारखी पसरली असून मृत्यूचे नेमके कारण फॉरेन्सिक (Forensic Report) आणि अंतिम वैद्यकीय अहवालानंतरच स्पष्ट होईल, असे वैद्यकीय प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे. सध्या संबंधित यंत्रणांकडून या प्रकरणाची चौकशी सुरू असून, संपूर्ण नाशिककरांचे लक्ष आता शवविच्छेदन अहवालाकडे लागले आहे. मयत श्रावणीच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे.

Comments
Add Comment

Nashik : नाशिक विभागातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षकांची भरती

Nashik : आदिवासी विकास विभागांतर्गत (Department of Tribal Development) कार्यरत शासकीय आश्रमशाळांमधील शिक्षकांची रिक्त पदे भरण्यासाठी

Mumbai Onion Price Hike : मुंबईत कांद्याचा भडका! कांद्याच्या दरवाढीमुळे गृहिणींचे गणित बिघडले; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

मुंबई : राजधानी मुंबईसह (Mumbai) संपूर्ण महाराष्ट्रातील प्रमुख बाजारपेठांमध्ये कांद्याचे दर (Onion Price Hike) अचानक गगनाला

Justice Sunil Shukre : न्या. सुनील शुक्रे यांनी घेतली महाराष्ट्र लोकायुक्त अध्यक्षपदाची पदाची शपथ

मुंबई : मुंबई उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे (Justice Sunil Shukre) यांनी मंगळवारी राज्याच्या

Navnath Ban : आदिवासी शाळांच्या अनुदानावरून भाजपचा काँग्रेसवर निशाणा; नवनाथ बन यांचा संजय राऊतांना सवाल

मुंबई : आदिवासी आश्रमशाळा, विद्यार्थ्यांना मिळणारे अनुदान आणि शाळांमधील कथित गैरप्रकारांवरून महाराष्ट्रातील

Amravat Fire news : 'बाळ गेल्याचं आईला कसं सांगू ?' अमरावती घटनेतील मृत बाळाच्या पित्याच्या काळीज पिळवटणारा सवाल

अमरावती : अमरावतीच्या जिल्हा स्त्री रुग्णालयात सोमवारी पहाटे साडेतीन वाजेच्या सुमारास एक अत्यंत हृदयद्रावक

Panvel ATM Fraud : पनवेलमध्ये ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार; कार्डची अदलाबदल करून ५० हजार रुपये लंपास

पनवेल : पनवेल शहरात ATM फसवणुकीचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. ATM मध्ये पैसे काढण्यासाठी गेलेल्या एका व्यक्तीचं