Wednesday, June 24, 2026

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

Vilas Ghule Murder Case: विलास घुले खून प्रकरणात पोलिसांची धडक कारवाई, सर्व ९ आरोपी ताब्यात

बीड : बीड (Beed) जिल्ह्यातील केज (Kej) तालुक्यातील टाकळी फाटा येथील हॉटेल चालक विलास घुले यांच्या हत्या (Murder) प्रकरणात पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. या प्रकरणातील फरार असलेल्या सर्व ९ आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना आज केज न्यायालयात हजर केले जाणार आहे. (Vilas Ghule Murder Case)

विलास घुले यांची काही दिवसांपूर्वी हॉटेल परिसरात सुरू असलेले भांडण सोडवण्यासाठी मध्यस्थी करत असताना चाकूने वार करून निर्घृण हत्या करण्यात आली होती. या घटनेनंतर संपूर्ण बीड जिल्ह्यात संतापाची लाट उसळली होती. कुटुंबीयांनी आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी करत पोलीस ठाण्यासमोर आंदोलनही केले होते.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन बीड पोलिसांनी विशेष तपास पथके तयार केली होती. तांत्रिक तपास, मोबाईल लोकेशन आणि गुप्त माहितीच्या आधारे राज्यातील विविध भागांत छापेमारी करून सर्व आरोपींना ताब्यात घेण्यात आले.

या प्रकरणात सुरुवातीला तीन आरोपींना अटक करण्यात आली होती. त्यानंतर उर्वरित आरोपींचा शोध सुरू होता. अखेर सर्व आरोपी पोलिसांच्या जाळ्यात अडकले आहेत.

दरम्यान, या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. आंदोलकांच्या मागणीनंतर पोलिसांनी रमेश घुले यांचा पुरवणी जबाब नोंदवला आहे. या जबाबात काही नव्या व्यक्तींची नावे समोर आल्याने पोलिसांकडून त्या अनुषंगाने तपास सुरू आहे.

पोलिसांनी स्पष्ट केले आहे की, तपासादरम्यान जे नवीन पुरावे समोर येतील त्यानुसार संबंधितांवर कठोर कायदेशीर कारवाई करण्यात येईल.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे: बाबासाहेब गुरुबा कदम, मंगेश गुरुबा कदम, रामेश्वर गायकवाड, शुभम रामभाऊ गायकवाड, भैय्यासाहेब गायकवाड, अजय उर्फ बंकट कदम, नवनाथ परसराम कदम, दिपक परसराम कदम (प्रकरणातील नववा आरोपी पोलिसांच्या ताब्यात असून न्यायालयीन प्रक्रियेसाठी सादर करण्यात येणार आहे.)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >