London : लंडनमध्ये खेळल्या गेलेल्या FIH प्रो लीग 2026 मधील बहुचर्चित भारत-पाकिस्तान सामन्यात भारतीय हॉकी संघाने 4-3 असा रोमांचक विजय मिळवत कट्टर प्रतिस्पर्ध्यावर पुन्हा एकदा आपले वर्चस्व सिद्ध केले. एकवेळ भारताने 4-1 अशी भक्कम आघाडी घेतली होती, मात्र अखेरच्या मिनिटांत पाकिस्तानने जोरदार पुनरागमन करत सामना चुरशीचा बनवला.
𝘐𝘯𝘥𝘪𝘢'𝘴 𝐃𝐚𝐛𝐝𝐚𝐛𝐚 𝘰𝘷𝘦𝘳 𝘗𝘢𝘬𝘪𝘴𝘵𝘢𝘯 𝘊𝘰𝘯𝘵𝘪𝘯𝘶𝘦𝘴 ⚡ After conceding early, India responded in style through Abhishek, Nilakanta Sharma, Sukhjeet Singh and Rajinder Singh to seal a close 4-3 victory in the FIH Hockey Pro League 2025–26 in London. 💪🏑 👏… pic.twitter.com/DtgCnb9LDy
— Hockey India (@TheHockeyIndia) June 23, 2026
बालविवाह रोखण्यासाठी सरकारचा नवा फॉर्म्युला; लग्नपत्रिकेत होणार मोठा बदल महाराष्ट्रात बालविवाह (Child Marriage) रोखण्यासाठी राज्य सरकार (Maharashtra Government) ...
सामन्याच्या सुरुवातीलाच पाकिस्तानने गोल करत 1-0 अशी आघाडी घेतली. पहिल्या क्वार्टरमध्ये भारताला अनेक पेनल्टी कॉर्नर मिळाले,पण पाकिस्तानच्या बचावफळीने सर्व प्रयत्न निष्फळ ठरवले. त्यामुळे पहिल्या सत्राअखेर पाकिस्तानकडे एक गोलची आघाडी कायम होती.दुसऱ्या क्वॉर्टरमध्ये मात्र भारताने दमदार पुनरागमन केले. अभिषेकने शानदार गोल करत सामना 1-1 असा बरोबरीत आणला. त्यानंतर निलाकांत शर्माने अचूक फिनिशिंग करत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवून दिली. मध्यांतरापर्यंत भारतीय संघाने सामन्यावर पूर्ण नियंत्रण मिळवले होते.तिसऱ्या क्वॉर्टरध्ये भारताचा आक्रमक खेळ कायम राहिला. सुखजीत सिंहने सुंदर गोल करत भारताची आघाडी 3-1 अशी वाढवली. पाकिस्तानच्या बचावफळीवर सतत दबाव निर्माण करत भारतीय खेळाडूंनी प्रतिस्पर्ध्यांना गोल करण्याची संधीच दिली नाही.
𝐑𝐀𝐉𝐈𝐍𝐃𝐄𝐑'𝐒 𝐆𝐎𝐀𝐋 𝐏𝐔𝐓 𝐓𝐇𝐄 𝐆𝐀𝐌𝐄 𝐁𝐄𝐘𝐎𝐍𝐃 𝐏𝐀𝐊𝐈𝐒𝐓𝐀𝐍'𝐒 𝐑𝐄𝐀𝐂𝐇 🇮🇳🔥
Rajinder Singh's strike in the 52nd minute pushed the scoreline to 4-1, leaving very little time for Pakistan to stage a comeback in the opening match of the London leg of… pic.twitter.com/2wqAAjNIGq — Hockey India (@TheHockeyIndia) June 24, 2026
Nashik Crime : मित्रांची दारू पार्टी अन त्यात मटण म्हटल्यावर अनेकांसाठी ही मजा काही औरच असते. पण नाशिकच्या एका तरुणाला मात्र ही दारू पार्टी अन त्यातले मटण ...
अंतिम क्वॉर्टरमध्ये भारताने आणखी एक गोल करत स्कोर 4-1 असा केला. त्यानंतर सामना भारताच्या खिशात गेला असे वाटत असतानाच पाकिस्तानने शेवटच्या काही मिनिटांत जोरदार प्रतिहल्ला चढवला. सलग दोन गोल करत त्यांनी 4-3 असा स्कोर करत भारतीय चाहत्यांची धडधड वाढवली. मात्र निर्णायक क्षणी भारतीय बचावफळीने शानदार खेळ दाखवला. पाकिस्तानचे सर्व प्रयत्न हाणून पाडत भारताने अखेर 4-3 असा विजय निश्चित केला. या विजयामुळे भारताने महत्त्वाचे तीन गुण मिळवले आणि प्रो लीगमधील आपली मोहीम अधिक मजबूत केली






