Tuesday, June 23, 2026

IPL 2027 : सस्पेन्स संपला ! आयपीएल २०२७ मध्येही सीएसकेच्या ताफ्यात दिसणार हा दिग्गज !!

IPL 2027 : सस्पेन्स संपला ! आयपीएल २०२७ मध्येही सीएसकेच्या ताफ्यात दिसणार हा दिग्गज !!
मुंबई : चेन्नई सुपर किंग्सच्या (CSK) चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. आयपीएल २०२६ मधील संघाच्या निराशाजनक कामगिरीनंतर, मुख्य प्रशिक्षक स्टीफन फ्लेमिंग (Stephen Fleming) यांच्या पदाबद्दल शंका निर्माण झाली होती. त्यांची जागा दुसऱ्या प्रशिक्षकाने घेतली जाईल अशी अटकळ होती. मात्र, आता अशी घोषणा करण्यात आली आहे की ते आयपीएल २०२७ मध्येही सीएसकेचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कायम राहतील.
मिडिया रिपोर्टनुसार, चेन्नई सुपर किंग्ज व्यवस्थापन सध्या कोचिंग स्टाफमध्ये कोणताही मोठा बदल करण्याच्या विचारात नाही आहे. सोशल मीडियावर काही चाहत्यांनी फ्लेमिंग यांना हटवण्याची मागणी केली असली, तरी फ्रँचायझीने अश्या चर्चांना फारसे महत्त्व दिलेले नाही.स्टीफन फ्लेमिंग हे CSK च्या यशामागील प्रमुख शिल्पकार मानले जातात. 2009 पासून त्यांनी मुख्य प्रशिक्षकाची जबाबदारी सांभाळली असून त्यांच्या मार्गदर्शनाखाली चेन्नईने पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकले आहे.तसेच संघाने तब्बल दहा वेळा अंतिम फेरी गाठण्याचा पराक्रम केला आहे.यामुळे संघ व्यवस्थापनाने त्यांच्यावर विश्वास कायम ठेवला आहे.
गेल्या दोन हंगामांत मात्र  सीएसकेची कामगिरी अपेक्षेप्रमाणे झाली नाही. 2025 मध्ये संघ गुणतालिकेत शेवटच्या स्थानावर राहिला होता, तर 2026 मध्ये आठव्या स्थानावर समाधान मानावे लागले. अशा परिस्थितीत प्रशिक्षक बदलाची चर्चा सुरू झाली होती. मात्र, चेन्नईची कार्यपद्धती इतर फ्रँचायझींपेक्षा वेगळी असल्याने त्यांनी घाईघाईत निर्णय न घेण्याचा मार्ग स्वीकारला आहे.फ्लेमिंग यांची भूमिका केवळ CSK पुरती मर्यादित नाही.ते CSK समूहाच्या इतर संघांमध्येही महत्त्वाची जबाबदारी सांभाळतात. सध्या ते अमेरिकेतील मेजर लीग क्रिकेट (MLC) स्पर्धेत टेक्सास सुपर किंग्स संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणून कार्यरत आहेत.दरम्यान, MLC स्पर्धा संपल्यानंतर CSK व्यवस्थापन आगामी हंगामाचा आढावा घेणार आहे. या बैठकीत संघाच्या भविष्यासंदर्भात चर्चा होणार असली तरी फ्लेमिंग यांच्या कराराबाबत कोणतीही शंका नसल्याचे संकेत मिळत आहेत.याच बैठकीत एम.एस. धोनीच्या भविष्यासंदर्भातही महत्त्वाची चर्चा होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. त्यामुळे CSK चाहत्यांचे लक्ष आता आगामी निर्णयांकडे लागले आहे*
Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >