Monday, June 22, 2026

ICC Take Action Against England : ICC ची इंग्लंड संघावर मोठी कारवाई! वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमधून तब्बल १२ गुण वजा

ICC Take Action Against England : ICC ची इंग्लंड संघावर मोठी कारवाई! वर्ल्ड टेस्ट क्रिकेटमधून तब्बल १२ गुण वजा

लंडन : जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या (WTC) अंतिम फेरीत पहिल्यांदाच स्थान मिळवण्याचे इंग्लंडचे स्वप्न मोठ्या संकटात सापडले आहे. न्यूझीलंडविरुद्ध ओव्हल येथे झालेल्या दुसऱ्या कसोटीत धीम्या षटकगतीचा फटका इंग्लंडला बसला असून, आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (ICC) संघावर कठोर कारवाई करत तब्बल १२ WTC गुण वजा केले आहेत. याशिवाय खेळाडूंना सामना शुल्काच्या ५० टक्के दंडालाही सामोरे जावे लागणार आहे. (ICC Take Action Against England)

ओव्हल कसोटीत न्यूझीलंडने शानदार कामगिरी करत इंग्लंडचा २५३ धावांनी पराभव केला आणि तीन सामन्यांच्या मालिकेत बरोबरी साधली. मात्र, या पराभवानंतर इंग्लंडच्या अडचणी आणखी वाढल्या. सामन्यानंतर झालेल्या तपासणीत इंग्लंड संघ निर्धारित वेळेपेक्षा १२ षटके मागे असल्याचे आढळून आले. ICC च्या नियमांनुसार प्रत्येक कमी षटकासाठी WTC गुणांची कपात करण्यात येते. त्यामुळे इंग्लंडला १२ गुण गमवावे लागले. (ICC Take Action Against England)

ICC ने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे की, प्रभारी कर्णधार जो रूटने संघाची चूक मान्य केली असून प्रस्तावित शिक्षेलाही सहमती दर्शवली. त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज पडली नाही आणि शिक्षा तत्काळ लागू करण्यात आली. (ICC Take Action Against England)

या दंडात्मक कारवाईमुळे इंग्लंडच्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपमधील स्थानाला मोठा धक्का बसला आहे. संघ सातव्या स्थानावर कायम असला तरी त्यांची गुणांची टक्केवारी (PCT) ३४.७२ वरून थेट २६.८३ पर्यंत घसरली आहे. परिणामी, अंतिम फेरीच्या शर्यतीत त्यांची स्थिती अधिकच कमकुवत झाली आहे. (ICC Take Action Against England)

सध्या WTC क्रमवारीत ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका हे संघ अव्वल दोन स्थानांवर असून, पुढील वर्षी लॉर्ड्स मैदानावर होणाऱ्या अंतिम सामन्यासाठी ते प्रमुख दावेदार मानले जात आहेत. इंग्लंडला आता उर्वरित सामन्यांत दमदार कामगिरी करून गुणांची भरपाई करावी लागणार आहे. (ICC Take Action Against England)

दरम्यान, इंग्लंडसाठी एक दिलासादायक बातमी म्हणजे नियमित कर्णधार बेन स्टोक्स तिसऱ्या आणि निर्णायक कसोटीसाठी संघात पुनरागमन करणार आहे. नॉटिंगहॅम येथे होणाऱ्या अंतिम सामन्यात स्टोक्सच्या नेतृत्वाखाली इंग्लंड मालिका जिंकण्याचा प्रयत्न करेल. दुसऱ्या कसोटीदरम्यान लंडनमधील एका नाइटक्लबमध्ये वेळेची मर्यादा ओलांडल्याप्रकरणी स्टोक्स आणि वेगवान गोलंदाज गस अ‍ॅटकिन्सन यांना निलंबित करण्यात आले होते. आता स्टोक्सच्या पुनरागमनामुळे संघाला नवसंजीवनी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. (ICC Take Action Against England)

मात्र, WTC गुण कपातीमुळे इंग्लंडसमोर आता दुहेरी आव्हान उभे राहिले आहे. मैदानावरील कामगिरीसोबतच नियमानुसार षटकगती राखणेही तितकेच महत्त्वाचे असल्याचे या कारवाईने पुन्हा एकदा अधोरेखित केले आहे. (ICC Take Action Against England)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा