Partner Swapping Gujarat : सौदे में पत्नी! सूरतमध्ये उघड झाला 'बायकांच्या अदलाबदलीचा' काळा धंदा
June 21, 2026 03:26 PM
गुजरात: गुजरातमध्ये (Gujrat) कथित पार्टनर स्वॅपिंग प्रकरणाची चर्चा रंगली असून, सुरतमधील एका महिलेने केलेल्या गंभीर आरोपांमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे. संबंधित महिलेने आपल्या पतीविरोधात तक्रार दाखल करत काही धक्कादायक दावे केले आहेत. (Partner Swapping)
नेमकं काय आहे हे प्रकरण?
पीडित महिलेच्या म्हणण्यानुसार, तिचे लग्न जुलै 2022 मध्ये झाले होते. लग्नानंतर सुरुवातीचे काही महिने सर्व काही सुरळीत सुरू होते. मात्र, त्यानंतर पतीने तिला कथित पार्टनर स्वॅपिंगबाबत माहिती देण्यास सुरुवात केली. तसेच या प्रकारात सहभागी होण्यासाठी दबाव टाकल्याचा आरोपही तिने केला आहे. (Wife Swapping)
सोशल मीडियाच्या माध्यमातून ओळख
पीडित महिलेचा दावा आहे की, काही लोक सोशल मीडियाच्या (Social Media) माध्यमातून एकमेकांच्या संपर्कात येतात. यासाठी बनावट प्रोफाइलचा वापर केला जातो. सुरुवातीला ऑनलाइन संवाद होतो त्यात व्हिडिओ कॉलद्वारे देखील बोलले जाते आणि त्यानंतर प्रत्यक्ष भेटींचे आयोजन केले जाते. या प्रक्रियेत अनेक जोडपी सहभागी असल्याचा आरोप तिने केला आहे.
महिलेने असा आरोपही केला की, तिचा पती यापूर्वीपासूनच या कथित नेटवर्कशी संबंधित होता. तिने या प्रकाराला विरोध केल्यानंतर वैवाहिक आयुष्यात तणाव निर्माण झाला. याप्रकरणी ती न्यायालयीन लढाईही लढत असल्याचे तिने सांगितले. (Surat Crime)
घटनेचा तपास सुरु
दरम्यान, या आरोपांबाबत अधिकृत तपास यंत्रणांकडून कोणतीही अंतिम पुष्टी करण्यात आलेली नाही. त्यामुळे या प्रकरणातील सर्व दावे हे संबंधित महिलेच्या आरोपांवर आधारित असल्याचे मानले जात आहे.
या घटनेनंतर वैवाहिक नातेसंबंध, सोशल मीडियाचा गैरवापर आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. संबंधित प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील घडामोडीकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.