Vaibhav Sooryvanshi : वैभव सूर्यवंशीचे अंतिम सामन्यात वादळ! अवघ्या ११ चेंडूंमध्ये रचला नवा विक्रम !

श्रीलंका : भारत अ आणि श्रीलंका अ यांच्यातील तिरंगी मालिकेचा अंतिम सामना सध्या सुरू आहे. श्रीलंका 'अ' संघाने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला, पण असे दिसते की त्यांचा डाव त्यांच्यावरच उलटला आहे. भारताचा युवा फलंदाज वैभव सूर्यवंशीने सुरुवातीपासूनच श्रीलंकेच्या गोलंदाजांवर दबाव टाकला. त्याने अवघ्या ११ चेंडूंमध्ये आपले पहिले अर्धशतक झळकावून विक्रम रचला आहे. या खेळीत त्याने केवळ चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने सुरुवातीच्या ६४ धावा केल्या. या महत्त्वाच्या सामन्यात वैभवने अवघ्या २९ चेंडूंमध्ये ९४ धावांची स्फोटक खेळी केली.





११ चेंडूंत मध्ये विक्रमी अर्धशतक


वैभव सूर्यवंशीच्या वादळी खेळीचा अंदाज यावरून लावता येतो की, त्याने पहिल्या ६४ धावा केवळ चौकार आणि षटकारांच्या साहाय्याने केल्या. त्याने आपल्या ९४ धावांच्या खेळीत १० चौकार आणि आठ षटकार मारले. अखेरीस, श्रीलंकेचा कर्णधार सहन अराचिगेच्या गोलंदाजीवर विजयकांतने त्याचा झेल घेतला आणि वैभवच्या स्फोटक खेळीचा शेवट झाला.





श्रीलंका विरुद्ध पुन्हा वाद !


श्रीलंका अ संघाविरुद्धच्या या मालिकेदरम्यान मैदानात खेळाडूंमध्ये शाब्दिक चकमक उडाल्याचं पाहायला मिळालं होतं. या वादाचे काही फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले होते. ही आयपीएल नाही, असं म्हणत श्रीलंकन खेळाडूने त्याला डिवचलं होतं. त्यानंतर आता वैभवने इंगा दाखवला आहे. मैदानातील वातावरण तापल्याचे पाहून पंचांनी आणि दोन्ही संघांच्या वरिष्ठ खेळाडूंनी मध्यस्थी करत हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता.





संक्षिप्त धावफलक


भारत अ ५० षटकांत ९ बाद ३७७ धावा, वैभव सूर्यवंशी २९ चेंडूत ९४ धावा


श्रीलंका : वानुजा साहन, रविंद्र फर्नांडो, कुगाथास मथुलन - प्रत्येकी २ विकेट्स
साहन अराच्चिगे, मोहम्मद शिराझ, दुलाज समुदिथा - प्रत्येकी १ विकेट

Comments
Add Comment

BWF World Championships : त्रिसा-गायत्रीची ऐतिहासिक कामगिरी; 15 वर्षांनंतर भारताचे महिला दुहेरीत विश्वविजेतेपदाचे पदक निश्चित

नवी दिल्लो : त्रिसा जॉली आणि गायत्री गोपीचंद या भारतीय महिला दुहेरी जोडीने बीडब्ल्यूएफ विश्व अजिंक्यपद स्पर्धेत

IND vs SL Test : कोलंबोच्या मैदानात पुन्हा इतिहास रचण्याची जय्यत तयारी; १६ वर्षांपूर्वी सचिन तेंडुलकरने झळकावले होते ऐतिहासिक द्विशतक!

भारत आणि श्रीलंका यांच्यातील रोमांचक कसोटी मालिकेचा दुसरा सामना २३ ऑगस्टपासून कोलंबो येथील प्रसिद्ध सिंहलीज

BPL suffers : बीपीएलला ३१ कोटींचा फटका! यंदा स्पर्धा रद्द होण्याची शक्यता; भारत-बांगलादेश मालिकेच्या वेळापत्रकातही बदलाचे संकेत

बांगलादेश क्रिकेट जगतातून एक मोठी बातमी समोर येत आहे. बांगलादेश क्रिकेट बोर्डाचे (BCB) अध्यक्ष तमीम इक्बाल यांनी

Duleep Trophy : दुलीप ट्रॉफीचा अंतिम सामना चेपॉक स्टेडियमवर खेळवण्यात येणार

नवी दिल्ली : दुलीप ट्रॉफी २०२६-२७ चा अंतिम सामना आता बंगळूरु येथील सेंटर ऑफ एक्सलन्स (CoE) ऐवजी चेन्नई येथील एम. ए.

Manu Bhaker : ऑलिम्पिक पदक विजेती मनू भाकर महाकालच्या चरणी

उज्जैन : ऑलिम्पिक पदक विजेती नेमबाज मनू भाकरने मध्य प्रदेशातील उज्जैन येथील जगप्रसिद्ध ज्योतिर्लिंग भगवान

BWF World Championships : महिला आणि पुरुष एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात; पीव्ही सिंधू आणि आयुष शेट्टीला पराभवाचा धक्का

नवी दिल्ली : २०२६ च्या बॅडमिंटन विश्व चॅम्पियनशिपमध्ये २० ऑगस्ट हा भारतासाठी निराशाजनक दिवस ठरला. महिला एकेरी,