Sunday, June 21, 2026

Odisha News : ये तो सिर्फ ट्रेलर है! सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडला 'कुबेराचा खजिना'

Odisha News : ये तो सिर्फ ट्रेलर है! सरकारी अधिकाऱ्याच्या घरी सापडला 'कुबेराचा खजिना'

कोट्यवधींची रोकड, ४९ प्लॉट्स आणि किलोभर सोनं पाहून यंत्रणाही हादरली!

ओडिशा : ओडिशामध्ये विजिलन्स विभागाने केलेल्या मोठ्या कारवाईत एका सरकारी अभियंत्याकडे कोट्यवधी रुपयांची कथित बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. या प्रकरणी संबंधित अधिकाऱ्याला अटक (Arrest) करण्यात आली असून त्याच्याविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (Satyanarayan Sethi)

कोरापुट जिल्ह्यातील कोटपाडा ब्लॉकमध्ये कार्यरत असलेले सहाय्यक कार्यकारी अभियंता सत्यनारायण सेठी यांच्यावर ही कारवाई करण्यात आली. तपासादरम्यान त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतांपेक्षा अनेकपटीने अधिक मालमत्ता असल्याचे समोर आले. (Odisha Vigilance Raid)

विजिलन्स विभागाच्या तपासात सेठी यांच्या मालकीची १४ एकर परिसरात पसरलेली ३ आलिशान फार्महाऊस, ४९ प्लॉट, २ फ्लॅट, ९४० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि २.५ किलो चांदी आढळून आली. याशिवाय ५.४८ लाख रुपये रोख रक्कम, ६०.९२ लाख रुपयांहून अधिक बँक ठेवी आणि एक चारचाकी वाहनही जप्त करण्यात आले. यापैकी काही मालमत्ता बेनामी असल्याचा संशय तपास यंत्रणांनी व्यक्त केला आहे. (Corruption Case)

या कारवाईसाठी विजिलन्स विभागाने सात विशेष पथके तयार केली होती. मोहिमेत ७ डीएसपी, ९ निरीक्षक, ११ एएसआय आणि इतर कर्मचारी सहभागी झाले होते. विविध ठिकाणी एकाच वेळी छापे टाकून मालमत्तेची पडताळणी करण्यात आली. (Vigilance Department)

सत्यनारायण सेठी यांनी १९९८ मध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून सरकारी सेवेत प्रवेश केला होता. त्यावेळी त्यांचा मासिक पगार ७१०० रुपये होता. पुढे पदोन्नती मिळवत ते सहाय्यक कार्यकारी अभियंता पदापर्यंत पोहोचले. मात्र आता त्यांच्या मालमत्तेच्या चौकशीत मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळल्याचा दावा विजिलन्स विभागाने केला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास सुरू असून आणखी काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा