Saturday, June 20, 2026

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज! पंढरपूरसाठी ५,५०० विशेष एसटी बसेस; ४० भाविकांनी मागणी केली तर गावातूनच थेट सेवा

Ashadhi Wari 2026 : आषाढी वारीसाठी ‘लालपरी’ सज्ज! पंढरपूरसाठी ५,५०० विशेष एसटी बसेस; ४० भाविकांनी मागणी केली तर गावातूनच थेट सेवा

मुंबई : आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर विठ्ठलभक्तांच्या सेवेसाठी राज्य परिवहन महामंडळाने (एसटी) मोठी तयारी केली आहे. राज्यभरातून पंढरपूरकडे जाणाऱ्या लाखो वारकऱ्यांच्या सोयीसाठी तब्बल ५,५०० विशेष एसटी बसेस सोडण्यात येणार असल्याची घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली आहे. (Ashadhi Wari 2026)

"ज्ञानोबा-तुकाराम"च्या जयघोषात आणि विठ्ठलनामाच्या गजरात पंढरपूरकडे निघालेल्या भाविकांचा प्रवास सुरक्षित, सुलभ आणि सुखकर व्हावा यासाठी एसटी महामंडळाने व्यापक नियोजन केले आहे. विशेष म्हणजे, राज्यातील कोणत्याही गावातून ४० किंवा त्यापेक्षा अधिक भाविकांनी एकत्रित मागणी केल्यास त्या गावातून थेट पंढरपूरसाठी विशेष बस उपलब्ध करून दिली जाणार आहे. (Ashadhi Wari 2026)

वारकऱ्यांच्या सेवेसाठी विशेष नियोजन :

दरवर्षी लाखो वारकरी पालख्यांसह पायी, रेल्वे, खासगी वाहने आणि एसटीच्या माध्यमातून पंढरपूरकडे प्रस्थान करतात. यंदाही भाविकांची मोठी गर्दी अपेक्षित असल्याने एसटी प्रशासनाने अतिरिक्त बसेस, कर्मचारी आणि सुविधा उपलब्ध करण्यावर भर दिला आहे. भाविकांनी विशेष बस सेवेसाठी आपल्या जवळच्या एसटी आगारात संपर्क साधून आगाऊ नोंदणी करावी, असे आवाहनही करण्यात आले आहे. (Ashadhi Wari 2026)

ज्येष्ठ नागरिक आणि महिलांना सवलती कायम :

आषाढी यात्रेसाठी चालवल्या जाणाऱ्या विशेष बस सेवांमध्ये शासनाच्या विविध सवलती कायम राहणार आहेत. 'अमृत ज्येष्ठ नागरिक योजना' अंतर्गत ७५ वर्षांवरील नागरिकांना मोफत प्रवास; 'महिला सन्मान योजना' अंतर्गत महिलांना तिकीट दरात ५० टक्के सवलत. यामुळे विठुरायाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भाविकांचा प्रवास अधिक परवडणारा ठरणार आहे. (Ashadhi Wari 2026)

मागील वर्षाचा विक्रम; यंदा अधिक व्यापक व्यवस्था :

मागील वर्षी आषाढी यात्रेदरम्यान एसटीने ५,२०० विशेष बसेसच्या माध्यमातून जवळपास २१ लाख ९५ हजार भाविकांची सुरक्षित ने-आण केली होती.

">यंदा त्यापेक्षा अधिक सक्षम आणि व्यापक नियोजन करण्यात आल्याचा दावा महामंडळाने केला आहे. (Ashadhi Wari 2026)

कर्मचाऱ्यांसाठीही विशेष सुविधा :

वारी काळात अहोरात्र सेवा देणाऱ्या चालक, वाहक, यांत्रिक कर्मचारी, पर्यवेक्षक आणि अधिकाऱ्यांचीही विशेष काळजी घेण्यात आली आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी स्वखर्चाने या कर्मचाऱ्यांसाठी चहा, नाश्ता आणि भोजनाची व्यवस्था केली आहे. या सुविधेचा लाभ सुमारे १३ हजार कर्मचारी घेणार आहेत. (Ashadhi Wari 2026)

वाहतूक व्यवस्थेसाठी पोलिसांना एसटीची साथ :

एकादशीच्या दिवशी आणि त्यानंतर परतीच्या प्रवासादरम्यान मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता असते. त्यामुळे वाहतूक नियंत्रणासाठी एसटीचे ३६ हून अधिक वाहतूक नियंत्रक आणि सुरक्षा रक्षक स्थानिक पोलीस प्रशासनासोबत कार्यरत राहणार आहेत. (Ashadhi Wari 2026)

पंढरपुरात चार तात्पुरती बस स्थानके :

भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन पंढरपूरमध्ये चार तात्पुरती बस स्थानके उभारण्यात येणार आहेत.

- चंद्रभागा बस स्थानक - भीमा (देगाव) बस स्थानक - विठ्ठल कारखाना बस स्थानक - पांडुरंग (आयटीआय महाविद्यालय) बस स्थानक

या ठिकाणी पिण्याचे पाणी, शौचालये, चौकशी कक्ष, संगणकीय आरक्षण सुविधा, मार्गदर्शन फलक आणि इतर आवश्यक सोयी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. (Ashadhi Wari 2026)

‘वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा’ :

राज्यभरातील भाविकांनी एसटीच्या सुरक्षित आणि विश्वासार्ह सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करताना मंत्री प्रताप सरनाईक म्हणाले की, "वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठलाची सेवा" या भावनेतून एसटी यंत्रणा संपूर्ण यात्राकाळात २४ तास सेवेसाठी सज्ज राहणार आहे.

">आषाढी वारीदरम्यान लाखो भाविकांना सुखकर प्रवासाचा अनुभव देण्यासाठी महामंडळ कटिबद्ध असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. (Ashadhi Wari 2026)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >