भीषण घटनेत दोन अग्निशमन जवान जखमी
मुंबई : वांद्रे (पश्चिम) (Bandra West) येथील शेर्ली राजन रोडवरील 'अटलांटिक' (Atlantic Building) या निवासी इमारतीच्या सातव्या मजल्यावर बुधवारी रात्री भीषण (Massive Fire) आग लागून एका ६४ वर्षीय रहिवाशाचा मृत्यू (Death) झाला. तर आग विझवण्याच्या मोहिमेदरम्यान दोन अग्निशमन जवान जखमी झाले आहेत. सुमारे अडीच तासांच्या अथक प्रयत्नांनंतर अग्निशमन दलाने आगीवर नियंत्रण मिळवले.
मुंबई : जून (June) महिन्याचा अर्धा टप्पा संपत आला असला तरी महाराष्ट्रात (Maharashtra) मान्सून (Monsoon) अद्याप पूर्णपणे सक्रिय झालेला नाही. त्यामुळे राज्यातील अनेक ...
मुंबई अग्निशमन दलाच्या माहितीनुसार, रात्री ९.१२ वाजता आगीची माहिती प्राप्त झाली. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन रात्री ९.५५ वाजता ही लेव्हल-1 आग घोषित करण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दल, मुंबई पोलीस, १०८ रुग्णवाहिका सेवा, वीज वितरण यंत्रणा आणि पालिका प्रशासनाने संयुक्तपणे बचावकार्य सुरू केले.
सातव्या मजल्यावर भीषण आग
आग तळमजला अधिक सात मजल्यांच्या इमारतीतील सातव्या मजल्यावरील रूम क्रमांक ७०१ आणि ७०२ मध्ये लागली होती. आगीत घरातील विद्युत वायरिंग, इलेक्ट्रिकल उपकरणे आणि अन्य घरगुती साहित्य जळून खाक झाले. काही रहिवासी वरच्या मजल्यांवर अडकल्याची भीती निर्माण झाल्याने अग्निशमन दलाने तातडीने शोध आणि बचाव मोहीम राबवली.
बचाव कार्यादरम्यान एकाचा मृत्यू
बचावकार्यादरम्यान अझीम बारोडावाला (वय ६४) यांना बाहेर काढून तातडीने भाभा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र, रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी घोषित केले.
५ जुलैनंतर आढावा घेतल्यानंतर कपातीचा घेतला जाणार निर्णय मुंबई (सचिन धानजी) मुंबईला (Mumbai) पाणी पुरवठा करणाऱ्या सर्व धरणांमध्ये पातळी घटत चालत असतानाच ...
भीषण आगीत दोन अग्निशमन जवान जखमी
आग विझवताना बांद्रा अग्निशमन केंद्राचे शिवशंकर भारत पुरी (३२) आणि नवनाथ मोहन बिटे (३४) हे दोन जवान धुरामुळे गुदमरल्याने जखमी झाले. त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार सुरू असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळाली आहे.
आगीचे रौद्ररूप पाहून नागरिकांमध्ये घबराट
स्थानिकांच्या म्हणण्यानुसार, आगीच्या ज्वाळा काही वेळातच वेगाने पसरल्यामुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले होते. आसपासच्या उंच इमारतींमधूनही आगीचे लोळ स्पष्ट दिसत होते. अग्निशमन दलाच्या तातडीच्या कारवाईमुळे आग इतर मजल्यांवर पसरण्यापासून रोखण्यात यश आले.
दरम्यान, आगीचे नेमके कारण अद्याप समोर आले नसून संबंधित यंत्रणांकडून सखोल तपास सुरू आहे.




