Mumbai News : मुंबईत फूड डिलिव्हरी करणारी तरुणी पोलीस दलातील नोकरीसाठी करत आहे तयारी

मुंबई : गर्दीने व्यापलेल्या मुंबईच्या रस्त्यांवर दिवसरात्र एक तरूणी धावत असते. हातात फूड डिलिव्हरी बॅग आणि डोळ्यांत मोठं स्वप्न... दिवसभर कामाच्या निमित्ताने संघर्ष तर रात्री अभ्यासासाठीची धडपड असा दुहेरी प्रवास न थकता न कंटाळता करत असलेली २३ वर्षांची खुशबू सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय आहे. उत्तर प्रदेश पोलीस दलाची परीक्षा उत्तीर्ण होऊन अधिकारी बनण्याचे स्वप्न उराशी बाळगत ती मुंबईत कष्टाने आयुष्य घडवत आहे.



मुंबईत फूड डिलिव्हरी पार्टनर म्हणून काम करणाऱ्या २३ वर्षीय खुशबूची संघर्षमय आणि प्रेरणादायी कथा सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे. स्वीगी फूट मार्केटप्लेसचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी तिचा व्हिडीओ शेअर केल्यानंतर तिच्या जिद्दीचे सर्वत्र कौतुक होत आहे.



मूळची गाझीपूरची खुशबू सध्या मुंबईत स्विगीसाठी फूड डिलिव्हरीची नोकरी करत आहे. तिला चार भावंडे आहेत. या सर्वांना चांगले आयुष्य जगता यावे यासाठी ती कुटुंबाला न सांगता मुंबई सारख्या शहरात आली. स्वतःच्या शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी तिने फूड डिलिव्हरीचे काम सुरू केले. दिवसा ती मुंबईच्या रस्त्यांवर फूड डिलिव्हरी करते,तर रात्री यूपी पोलीस भरती परीक्षेची तयारी करते. पोलीस अधिकारी झाल्यावर गावी जायचे असे स्वप्न खुशबूने उराशी बाळगले आहे.



स्वीगीचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहित कपूर यांनी व्हिडीओ शेअर करत खुशबूच्या कष्टांचे आणि संघर्षाचे कौतुक केले. तिच्या ध्येयात सुस्पष्टता दिसते. तिच्या या प्रयत्नांतून अनेकांना प्रेरणा मिळू शकते असा विश्वास रोहित यांनी व्यक्त केला.



भारतीय गावांनी अनेक दशकांपासून लोकांना शहरांकडे जाताना पाहिले आहे.खुशबू देखील गेली,पण मुंबईतून परत जायचे आहे म्हणून ती मुंबईत आली आहे. बहुतेक जण मुंबईत येतात आणि पुन्हा कधीही परत जाऊ इच्छित नाहीत. पण खुशबू अशी आली आहे की ती परत जाईल आणि मोठी कौतुकास्पद कामगिरी करुनच जाईल, असे रोहित यांनी व्हिडीओ शेअर करताना नमूद केले आहे.


रोहित यांनी शेअर केलेला व्हिडीओ व्हायरल होत आहे. अनेकांनी खुशबूच्या मेहनतीचे कौतुक केले आहे तर काहींनी अशा कर्मचाऱ्यांसाठी कंपन्यांनी अधिक शैक्षणिक मदत व प्रशिक्षण सुविधा उपलब्ध करून द्याव्यात अशी अपेक्षा व्यक्त केली आहे. खुशबूची ही कहाणी तरुणाईसाठी प्रेरणादायी आहे.

Comments
Add Comment

Nitesh Rane : सिंधुदुर्गातील मोबाईल नेटवर्कच्या समस्येवर कायमस्वरूपी तोडगा निघणार; पालकमंत्री नितेश राणे यांचे जिओच्या अधिकाऱ्यांना निर्देश

नव्या टॉवर्ससह सेवा सक्षम करण्यावर

Nitesh Rane : देवगडच्या आनंदवाडी मत्स्यबंदर विकासाला गती मिळणार, प्रस्तावित कामांच्या नियोजनाचे निर्देश; मंत्री नितेश राणे यांनी घेतला आढावा

मुंबई : सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील आनंदवाडी मत्स्यबंदराच्या विकासकामांना गती देताना स्थानिक

Nitesh Rane : मच्छीमारांच्या नुकसानभरपाई धोरणाचा मंत्री नितेश राणे यांच्याकडून मंत्रालय स्तरावर सर्वंकष आढावा

मच्छीमारांच्या नुकसानभरपाईचा नव्याने विचार; TISS अहवालानंतर निर्णय घेणार ; मंत्री नितेश राणे मुंबई :

Nitesh Rane : पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या; मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे

सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव देणारा महत्त्वाकांक्षी

Ashish Shelar : मंत्री आशिष शेलार यांनी स्वीकारला एन. डी. स्टुडिओच्या अध्यक्षपदाचा पदभार; चित्रपट निर्मितीला चालना देण्यासाठी महत्त्वपूर्ण निर्णय

एन. डी. स्टुडिओमध्ये चित्रिकरणासह सर्व घटकांवर ३१ मार्च २०२७ पर्यंत ५० टक्के

Jaykumar Rawal and Shambhuraj Desai : आग्रा येथील शिवपराक्रम नव्या पिढीपर्यंत; १७ ऑगस्ट ‘शिवचातुर्य दिन’ म्हणून साजरा होणार

आग्रा येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या ऐतिहासिक पराक्रमाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचविणार -राजशिष्टाचार