Wednesday, June 17, 2026

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident : गुजरातमध्ये भीषण बस अपघात; ट्रकला धडकून 5 प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

Vadodara Accident: वडोदरा : गुजरातमधील (Gujarat) वडोदरा-जारोड महामार्गावर आज पहाटे झालेल्या भीषण अपघातात (Accident) पाच जणांचा मृत्यू (Death) झाला असून अनेक प्रवासी जखमी झाले आहेत. कोटंबी गावाजवळ एका आलिशान बसने समोरून जाणाऱ्या ट्रकला मागून जोरदार धडक दिल्याने हा अपघात घडला.

मिळालेल्या माहितीनुसार, अपघात इतका भीषण होता की बसचा पुढील भाग पूर्णपणे चक्काचूर झाला. धडकेनंतर बसमधील प्रवाशांमध्ये एकच गोंधळ उडाला आणि परिसर प्रवाशांच्या किंकाळ्यांनी दुमदुमून गेला.

घटनेची माहिती मिळताच जारोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले. अपघाताचे गांभीर्य लक्षात घेऊन बचाव कार्यासाठी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाच्या (NDRF) पथकालाही तातडीने पाचारण करण्यात आले. बचाव पथकाने जखमी प्रवाशांना बाहेर काढून जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. रुग्णालयात डॉक्टरांचे विशेष पथक जखमींवर उपचार करत आहे.

या अपघातात पाच प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला. मृतांची ओळख पटविण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबीयांना माहिती देण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

दरम्यान, अपघातामुळे काही काळ महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती. पोलिसांनी मृतदेह शवागारात हलवून पंचनामा केला असून अपघाताची नोंद घेण्यात आली आहे. बसचालकाला झोप अथवा चक्कर आल्याने अपघात झाला की ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात हा प्रकार घडला, याचा तपास पोलीस करत आहेत.

या भीषण दुर्घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून पुढील तपास सुरू आहे.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >