न्यू जर्सी : फिफा विश्वचषक २०२६ स्पर्धेत फ्रान्सने आपल्या विजेतेपदाच्या दाव्याला साजेसा खेळ करत सेनेगलचा ३-१ असा पराभव केला. या सामन्याचा नायक ठरला फ्रान्सचा कर्णधार किलियन एमबाप्पे. त्याने दोन गोल झळकावत केवळ संघाला विजय मिळवून दिला नाही, तर फ्रान्सचा सर्वकालीन सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनण्याचाही मान पटकावला. (France vs Senegal FIFA World Cup 2026)
सेनेगलचा स्ट्रायकर निकोलस जॅक्सनचा फटका थेट खांबावर आदळला, तर इस्माईला सारला जवळून मिळालेली सुवर्णसंधी वाया घालवावी लागली. पहिल्या हाफमध्ये सेनेगलचा खेळ अधिक प्रभावी दिसत होता आणि ते आघाडी घेतील असे चित्र निर्माण झाले होते. (France vs Senegal FIFA World Cup 2026)
मुंबई : भारताचा माजी ऑफ-स्पिनर रविचंद्रन अश्विन आता अमेरिकेच्या टी-२० लीगमध्ये खेळताना दिसणार आहे. त्याने आगामी मेजर लीग क्रिकेट (एमएलसी) हंगामासाठी ...
मात्र दुसऱ्या सत्रात फ्रान्सने आपला खरा दर्जा दाखवला. प्रशिक्षक दिदिएर डेशाँ यांनी संघरचनेत केलेल्या बदलांचा मोठा फायदा झाला. मिडफिल्डमध्ये नियंत्रण मिळवत फ्रान्सने हळूहळू सामन्यावर पकड मजबूत केली. (France vs Senegal FIFA World Cup 2026)
सामन्याचा कोंडी फोडणारा गोल मायकेल ओलिसेच्या अप्रतिम पासवर एमबाप्पेने केला. त्यानंतर फ्रान्सचा आत्मविश्वास वाढला आणि सेनेगलचा प्रतिकार कमी होत गेला. काही क्षणांतच बदली खेळाडू ब्रॅडली बार्कोलाने अॅड्रियन राबिओच्या पासवर सुंदर गोल करत फ्रान्सची आघाडी २-० अशी वाढवली. (France vs Senegal FIFA World Cup 2026)
फुटबॉल विश्वचषकाचा महाकुंभ सध्या जगभरात सुरू आहे. युरोप आणि आफ्रिकेतील संघांची धडाकेबाज कामगिरी पाहून प्रत्येक भारतीय चाहत्याच्या मनात एकच प्रश्न ...
सेनेगलने उशिरा एक गोल करून पुनरागमनाचा प्रयत्न केला, मात्र एमबाप्पेने आणखी एक गोल झळकावत विजयावर शिक्कामोर्तब केले. अखेरीस फ्रान्सने ३-१ अशा फरकाने सामना जिंकत विश्वचषक मोहिमेची विजयी सुरुवात केली. (France vs Senegal FIFA World Cup 2026)




