Monday, June 15, 2026

Former BJP MLA Patlya Guruji : भाजपाचे माजी आमदार पटल्या गुरुजी काळाच्या पडद्याआड; मेळघाटच्या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा निरोप, सर्वत्र हळहळ

Former BJP MLA Patlya Guruji : भाजपाचे माजी आमदार पटल्या गुरुजी काळाच्या पडद्याआड; मेळघाटच्या ज्येष्ठ नेत्याला अखेरचा निरोप, सर्वत्र हळहळ

अमरावती : मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे माजी आमदार तसेच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ आणि एकनिष्ठ नेते पटल्या गुरुजी मावस्कर (Former BJP MLA Patlya Guruji) यांचे सोमवारी (१५ जून) पहाटे अमरावती येथील चौधरी रुग्णालयात उपचारादरम्यान निधन झाले. त्यांच्या निधनाने मेळघाटसह संपूर्ण अमरावती जिल्ह्यावर शोककळा पसरली असून राजकीय, सामाजिक आणि शैक्षणिक क्षेत्रातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

सेवानिवृत्त मुख्याध्यापक म्हणून कार्यरत असलेल्या पटल्या गुरुजी मावस्कर यांनी १९९४ ते १९९९ या कालावधीत मेळघाट विधानसभा मतदारसंघाचे आमदार म्हणून प्रतिनिधित्व केले होते. आपल्या साध्या, प्रामाणिक आणि लोकाभिमुख कार्यपद्धतीमुळे त्यांनी जनतेच्या मनात वेगळे स्थान निर्माण केले होते. (Former BJP MLA Patlya Guruji)

त्यांच्या निधनाची बातमी समजताच विविध क्षेत्रांतील मान्यवरांनी श्रद्धांजली अर्पण केली. मेळघाट परिसरासह राज्याच्या विविध भागांतून शोकसंदेशांचा ओघ सुरू झाला आहे. (Former BJP MLA Patlya Guruji)

सोमवारी दुपारी त्यांच्या पार्थिवाचे अंतिम दर्शन घेण्यासाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली. सायंकाळी ५ वाजता धारणी येथील सिव्हील लाईन परिसरातील निवासस्थानावरून अंत्ययात्रा काढण्यात आली. त्यानंतर धारणी येथील हिंदू मोक्षधाम येथे शासकीय व धार्मिक विधींनुसार अंत्यसंस्कार करण्यात आले. (Former BJP MLA Patlya Guruji)

भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी अमरावती येथील चौधरी रुग्णालयात जाऊन पटल्या गुरुजींच्या पार्थिवाचे दर्शन घेत कुटुंबीयांचे सांत्वन केले. त्यांच्या पश्चात पुत्र रमेश मावस्कर, सून रेखा मावस्कर तसेच मोठा परिवार आहे. रमेश मावस्कर हे भारत हेवी इलेक्ट्रिकल्स लिमिटेड (BHEL) चे माजी संचालक तसेच अमरावती विभागीय अन्न पुरवठा विभागाचे माजी उपायुक्त असून सध्या भाजपमध्ये सक्रियपणे कार्यरत आहेत. (Former BJP MLA Patlya Guruji)

मुख्यमंत्री फडणवीसांनी वाहिली आदरांजली :

भाजपाचे ज्येष्ठ नेते तथा माजी आमदार पटल्या (गुरुजी) मावस्कर यांच्या निधनाचे वृत्त अतिशय दुःखद आहे. मेळघाटातील आदिवासी बांधवांच्या उन्नतीसाठी मावस्कर गुरुजी यांनी दिलेले योगदान उल्लेखनीय आहे. समाजातील वंचित घटकांच्या प्रगतीसाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले आणि लोककल्याणाला सर्वोच्च प्राधान्य दिले. समाजहितासाठीचे त्यांचे कार्य आणि योगदान पुढील पिढ्यांसाठी चिरंतन स्मरणात राहील. त्यांच्या कुटुंबीयांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो. ॐ शांति (Former BJP MLA Patlya Guruji)

पटल्या गुरुजी मावस्कर यांच्या निधनाने मेळघाटने एक अनुभवी लोकनेता, शिक्षणप्रेमी आणि समाजाभिमुख व्यक्तिमत्त्व गमावल्याची भावना सर्व स्तरांतून व्यक्त होत आहे. (Former BJP MLA Patlya Guruji)

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा


संबंधित बातम्या आणखी वाचा >