फिफा विश्वचषक २०२६ मधील गट ‘जी’च्या सामन्यात बेल्जियम आणि इजिप्त यांच्यात १-१ अशी रंगतदार बरोबरी झाली. मात्र या निकालामुळे इजिप्तचा स्टार फुटबॉलपटू मोहम्मद सलाहचा ३४ वा वाढदिवस संस्मरणीय ठरण्याऐवजी निराशाजनक ठरला. इजिप्त विजयाच्या उंबरठ्यावर असताना बेल्जियमने दुसऱ्या सत्रात पुनरागमन करत सामना बरोबरीत सोडवला. (FIFA World Cup 2026 Egypt vs Belgium)
विश्वचषकाच्या इतिहासात इजिप्तने आघाडी घेतल्याची ही केवळ दुसरी वेळ ठरली. यापूर्वी २०१८ मध्ये सौदी अरेबियाविरुद्ध मोहम्मद सलाहने गोल करत संघाला आघाडी मिळवून दिली होती. (FIFA World Cup 2026 Egypt vs Belgium)
फिफा विश्वचषक २०२६ मध्ये पहिलाच मोठा उलटफेर पाहायला मिळाला. स्पर्धेतील प्रबळ दावेदार मानल्या जाणाऱ्या स्पेनला विश्वचषकात पदार्पण करणाऱ्या केप ...
दुसऱ्या सत्रात बेल्जियमने जोरदार पुनरागमनाचा प्रयत्न केला. केविन डी ब्रुयनचा फ्री-किकचा प्रयत्न थेट पोस्टला लागून परत आला. त्यानंतर सलाहनेही गोल करण्याची संधी निर्माण केली, मात्र त्याचा हेडर कोर्ट्वाने उत्कृष्ट बचाव करत रोखला. (FIFA World Cup 2026 Egypt vs Belgium)
सामन्याच्या अखेरीस इजिप्तने बचावावर भर दिला आणि बेल्जियमला आणखी गोल करू दिला नाही. अखेर दोन्ही संघांना प्रत्येकी एका गुणावर समाधान मानावे लागले. या निकालामुळे सात वेळा आफ्रिका कप ऑफ नेशन्स जिंकणाऱ्या इजिप्तचा विश्वचषकातील पहिल्या विजयाचा प्रतीक्षाकाल आणखी वाढला आहे. विश्वचषकातील त्यांच्या चौथ्या सहभागातही विजयाचे खाते उघडण्यात त्यांना अपयश आले. आता इराण आणि न्यूझीलंडविरुद्धच्या पुढील सामन्यांत इजिप्तला विजयाची संधी असेल. (FIFA World Cup 2026 Egypt vs Belgium)
अर्लिंग्टन, टेक्सास: फुटबॉलच्या मैदानात केवळ आपल्या खेळानेच नव्हे, तर आपल्या शिस्तबद्ध वागणुकीने जपानच्या चाहत्यांनी पुन्हा एकदा जगभरातील फुटबॉल ...
दुसरीकडे, बेल्जियमच्या ‘गोल्डन जनरेशन’साठी हा कदाचित अखेरचा विश्वचषक मानला जात आहे. केविन डी ब्रुयन, थिबॉ कोर्ट्वा आणि रोमेलू लुकाकू यांसारख्या अनुभवी खेळाडूंवर संघाच्या यशाची जबाबदारी असून, रशिया २०१८ मधील तिसऱ्या स्थानापेक्षा सरस कामगिरी करण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. (FIFA World Cup 2026 Egypt vs Belgium)




