Nashik : प्रयागराजच्या कुंभमेळ्यात सहभागी होऊ न शकलेले भाविक नाशिकच्या कुंभोत्सवात सहभागी होतील. कुंभमेळ्यादरम्यान ८ ते १० कोटी भाविक येण्याची अपेक्षा असून त्यांच्या स्वागतासाठी शहरात विविध विकासकामे सुरू आहेत. पुढेही नाशिकचा विकास अशाच वेगाने सुरू राहणार असून या विकासगंगेत प्रत्येक घटकाने सहभागी व्हावे, असे आवाहन महापौर हिमगौरी आहेर-आडके यांनी केले.
प्रोफेशनल रिअल्टर्स असोसिएशन ऑफ नाशिक (प्राण) यांच्या वतीने आणि आयसीआयसीआय बँकेच्या सहकार्याने शनिवारी (१३ जून) कॉलेज रोडवरील गुरुदक्षिणा संकुलातील पलाश सभागृहात आयोजित ३५व्या ‘नॉलेज फोरम’ सत्रात त्या बोलत होत्या. ‘नाशिक शहराचा विकास आराखडा – महापौरांच्या शब्दांत!’ या विषयावर त्यांनी प्रभावी सादरीकरण केले.
Nashik : राज्यात अद्याप तरी पावसाचे प्रमाण अपुरे आहे. त्यामुळे राज्यात पाणीटंचाई निर्माण झाली आहे. पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर, ३१ ऑगस्टपर्यंत ...
कार्यक्रमास ‘प्राण’चे अध्यक्ष राज तलरेजा, सचिव नितीन कोतकर, खजिनदार नितीन जांगडा, नॉलेज फोरमचे प्रमुख प्रशांत नहार, प्रदीप रणधीर, विक्रांत आव्हाड तसेच आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड सुधीर जोशी आदी मान्यवर उपस्थित होते. महापौर हिमगौरी आहेर-आडके म्हणाल्या की, प्रशासकीय राजवटीच्या काळात कुंभमेळ्याच्या कामांना मंजुरी मिळाली होती. निवडणुकीनंतर निवडून आलेले सर्व नगरसेवक मिळून या नियोजनाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. सध्या सुरू असलेल्या विकासकामांचा नकारात्मक प्रचार केला जात असला, तरी ही कामे पूर्ण झाल्यानंतर शहराच्या सौंदर्यात मोठी भर पडणार आहे. त्यामुळे गुंतवणूकदार आकर्षित होतील आणि अनेकांना नाशिकमध्ये स्वतःचे स्वप्नातील घर घ्यावेसे वाटेल. यासाठी काही काळ नागरिकांनी सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. अमृतकुंभ २०४७’ या सादरीकरणादरम्यान त्यांनी नाशिकमधील पर्यटन, उद्योग-व्यवसाय, गुंतवणुकीच्या संधी आणि विविध महत्त्वाकांक्षी प्रकल्पांची माहिती दिली.
Nashik News : गेल्या काही महिन्यांत नाशिकमध्ये अनेक रिक्षाचालक अरेरावी करत असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत. पण याच रिक्षाचालकांच्या अरेरावीची ...
या सत्रापूर्वी आयसीआयसीआय बँकेचे रिजनल हेड सुधीर जोशी यांनी कॅपिटल गेन टॅक्सविषयी उपस्थितांना मार्गदर्शन केले. ही सेवा पुरविणारी आयसीआयसीआय बँक ही पहिली खासगी बँक असल्याचे सांगताना त्यांनी योजनेचे फायदे विशद केले. तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मॉर्गेजविषयी सविस्तर माहिती दिली. कार्यक्रमासाठी ‘प्राण’चे अध्यक्ष राज तलरेजा, सचिव नितीन कोतकर, कोषाध्यक्ष नितीन जंगडा, सहखजिनदार अमित वाघ, सल्लागार डी. जे. धामणे, राजेंद्र कोतकर, कैलास कदम, अमित पटेल, रविंद्र सूर्यवंशी, प्रशांत नहार, जगदीश बंग, पवन राठी, जनसंपर्क प्रमुख संजय दुसे, योगेश नेरकर, नीलेश येवले, क्षितिज दंडगव्हाळ, मनीष शाह, प्रियांका तलरेजा, नम्रता वेदिया, भावेश सचदेव, बादल अग्रवाल आदींसह संपूर्ण टीमने परिश्रम घेतले.
शहराच्या विकासात रिअल्टर्सचे योगदान अत्यंत महत्त्वाचे आहे. त्यांचे ज्ञान अद्ययावत राहावे यासाठी ‘नॉलेज फोरम’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. महापौर हिमगौरी आहेर-आडके यांच्या उपस्थितीमुळे आजचा उपक्रम अधिक प्रभावी ठरल्याचे सांगितले.
राज तलरेजा, अध्यक्ष ‘प्राण’





