अमेरिकन डॉलर आणि इतर जागतिक चलनांच्या तुलनेत भारतीय रुपया १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने परदेशात शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांचे बजेट कोलमडले आहे. दरवर्षी लाखो भारतीय विद्यार्थी उच्च शिक्षणासाठी परदेशात जातात. मात्र, सध्या परदेशात जाऊन शिक्षण घेण्याचे स्वप्न पाहणाऱ्या भारतीय विद्यार्थ्यांसमोर आणि त्यांच्या पालकांसमोर एक मोठे आर्थिक आव्हान उभे राहिले आहे. गेल्या एका वर्षात अमेरिकन डॉलरच्या तुलनेत भारतीय रुपया १० टक्क्यांहून अधिक घसरल्याने परदेशी शिक्षणाचा प्रवास अत्यंत महागडा झाला असून पालकांच्या खिशाला मोठी कात्री लागली आहे.
मुंबई : महाराष्ट्र विधिमंडळाचे पावसाळी अधिवेशन २२ जून ते १० जुलै या कालावधीत मुंबईत होणार आहे. विधिमंडळ कामकाज सल्लागार समितीच्या बैठकीत सोमवारी ...
रुपया केवळ डॉलरच्या तुलनेत घसरला नाही. तर आशियातील सर्वात कमजोर चलन ठरले आहे. ब्रिटन, कॅनडा, ऑस्ट्रेलिया आणि युरोपमधील इतर प्रमुख देशांच्या चलनांच्या तुलनेतही रुपया कोसळला आहे. त्यामुळे परदेशी शिक्षण घेणाऱ्या मुलांना पैसे पाठवताना पालकांची आर्थिक ओढाताण होत आहे. ‘युनिव्हर्सिटी लिविंग’चे संस्थापक आणि सीईओ सौरभ अरोरा यांच्या मते, रुपयाच्या घसरणीमुळे विद्यार्थ्यांच्या वार्षिक खर्चात मोठी वाढ झाली आहे. पूर्वी अभ्यासक्रम पूर्ण करायला वर्षाला ३५ ते ७० लाख रुपये खर्च होता, तिथे आता अतिरिक्त ४ ते ८ लाख रुपये जास्त मोजावे लागत आहेत. ‘वनस्टेप ग्लोबल’चे संचालक स्टीफन रोच यांच्या विश्लेषणानुसार, दोन वर्षांच्या पदव्युत्तर पदवीसाठी ५० ते ६० लाख रुपयांचे बजेट ठेवलेल्या विद्यार्थ्यांना आता कोणतीही शुल्कवाढ झाली नसताना, ५ ते ७ लाख रुपये जास्त द्यावे लागत आहेत.






