Saturday, June 13, 2026

Missile Trials : भारताची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक भक्कम! DRDO च्या सलग तीन यशस्वी चाचण्या; जगातील मोजक्या देशांच्या यादीत भारत

Missile Trials : भारताची क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली अधिक भक्कम! DRDO च्या सलग तीन यशस्वी चाचण्या; जगातील मोजक्या देशांच्या यादीत भारत

नवी दिल्ली : भारताने संरक्षण (Defence) क्षेत्रात आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था (DRDO - Defence Research and Development Organisation) ने १० आणि ११ जून रोजी सलग तीन यशस्वी क्षेपणास्त्र (Missile) चाचण्या पार पाडत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली (Ballistic Missile Defence System - BMD) आणि नौदलासाठीच्या अँटी-शिप क्षेपणास्त्र (Anti-Ship Missile) तंत्रज्ञानाची यशस्वी चाचणी केली.

DRDO ने दिलेल्या माहितीनुसार, भारताच्या बहुस्तरीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीने (Multi-layered Ballistic Missile Defence System) लक्ष्य म्हणून सोडण्यात आलेल्या क्षेपणास्त्रांचा अचूक वेध घेत त्यांचा यशस्वी नाश केला. या चाचण्यांमुळे भारताची लांब पल्ल्याच्या बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांविरोधातील संरक्षण क्षमता अधिक मजबूत झाल्याचे दिसत आहे.

२,००० ते ५,००० किमी पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांना रोखण्याची क्षमता

उच्चपदस्थ सरकारी सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, DRDO ने अशा दोन इंटरसेप्टर क्षेपणास्त्रांची (Interceptor Missiles) यशस्वी चाचणी घेतली जी २,००० ते ५,००० किलोमीटर पल्ल्याच्या इंटरमिजिएट रेंज बॅलेस्टिक मिसाइल्स (Intermediate Range Ballistic Missiles - IRBM) नष्ट करण्यास सक्षम आहेत.

यामध्ये वातावरणाबाहेरील (Exo-atmospheric) आणि वातावरणातील (Endo-atmospheric) अशा दोन्ही प्रकारच्या इंटरसेप्टरचा समावेश होता. चाचण्यांचे सर्व टप्पे पूर्ण झाल्यानंतर ही क्षेपणास्त्रे लवकरच सैन्याच्या वापरासाठी (User Trials) पाठवली जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

पाकिस्तानच्या वाढत्या क्षेपणास्त्र क्षमतेच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचा निर्णय

पाकिस्तानकडून फतेह-१ (Fateh-I), फतेह-२ (Fateh-II) आणि चीनच्या मदतीने विकसित करण्यात आलेल्या पी-२८२ (P282) सारख्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्रांचा विकास सुरू असल्याने DRDO ने बॅलेस्टिक क्षेपणास्त्र संरक्षण प्रणालीला विशेष प्राधान्य दिले आहे.

जगातील मोजक्या देशांच्या यादीत भारत

या यशस्वी चाचण्यांमुळे भारत आता अमेरिका, रशिया, चीन आणि इस्रायलसारख्या त्या मोजक्या देशांच्या यादीत अधिक सक्षमपणे स्थान मिळवत आहे, ज्यांच्याकडे बॅलेस्टिक तसेच आंतरखंडीय बॅलेस्टिक क्षेपणास्त्रांच्या (Intercontinental Ballistic Missiles - ICBM) धोक्याचा सामना करण्याची क्षमता आहे.

नौदलासाठी NASM-MR ची पहिली यशस्वी चाचणी

याच दरम्यान DRDO ने नौदलासाठी विकसित करण्यात आलेल्या नेव्हल अँटी-शिप मिसाइल - मिडियम रेंज (Naval Anti-Ship Missile - Medium Range : NASM-MR) ची पहिली यशस्वी उड्डाण चाचणी (Maiden Flight Test) देखील पार पाडली. या चाचणीमुळे मध्यम अंतरावरील शत्रूच्या युद्धनौकांवर अचूक हल्ला करण्याची भारतीय सशस्त्र दलांची क्षमता आणखी वाढणार आहे. यामुळे भारताच्या सागरी सुरक्षा (Maritime Security) आणि सागरी आक्रमण क्षमतेला मोठी ताकद मिळाली आहे.

राजनाथ सिंह यांचे DRDO ला अभिनंदन

या ऐतिहासिक यशाबद्दल संरक्षण मंत्री (Defence Minister) Rajnath Singh यांनी DRDO च्या शास्त्रज्ञांचे आणि भारतीय सशस्त्र दलांचे अभिनंदन केले. या यशामुळे भारताची संरक्षण सज्जता (Defence Preparedness) अधिक मजबूत होईल आणि हवाई तसेच सागरी धोक्यांचा प्रभावीपणे मुकाबला करण्याची क्षमता वाढेल, असे त्यांनी म्हटले.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >