Nashik Breaking News : गंगापूर धरण परिसरात 4 जणांचा बुडून मृत्यू

Nashik : नाशिकमधून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. नाशिकच्या गंगापूर डॅम परिसरात फिरण्यासाठी गेलेल्या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला आहे. आज गुरुवारी ही दुर्दैवी घटना घडली असून या घटनेनं संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. या हृदयद्रावक घटनेत तीन अल्पवयीन मुलांचा तर एका विवाहित तरुणीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. या घटनेनं चारही कुटुंबावर दुःखांचा डोंगर कोसळला आहे.दरम्यान जिल्ह्यात धरणांत बुडून मृत्युमुखी पडणाऱ्यांची वाढती संख्या चिंतेची बाब ठरत आहेत.



नेमकं काय घडलं ?


मिळालेल्या माहितीनुसार नाशिक शहरातील तीन तरुण आणि एक विवाहित महिला गंगापूर धरणाच्या (Gangapur Dam) बॅक वॉटर भागात फेर फटकामारण्यासाठी गेली होती. पाण्याचा अंदाज न आल्याने एकजण खोल पाण्यात गेला आणि बुडू लागला. त्याला वाचवण्याच्या प्रयत्नात इतर तिघेही पाण्याच्या प्रवाहात ओढले गेले. घटना पाहणाऱ्या स्थानिकांनी तातडीने गंगापूर पोलीस (Gangapur Police) व अग्निशमन दलाला याबाबत माहिती दिली. घटनास्थळी दाखल झालेल्या बचाव पथकाने शोधकार्य सुरू करून चौघांचे मृतदेह बाहेर काढले.


मृतांमध्ये मयुरी पवन जाधव (वय 22 राहणार अंजनेरी त्र्यंबक) तर गणेश सुरेश गोतरने (वय 16), निखिल मच्छिन्द्र गौतरणे (वय 15) तर साहिल मनोहर गोतराने ( वय 16) हे तिघे सावरगाव तालुका नाशिक येथे राहणारे असून सखे चलत भाऊ होते. अपघाताची माहिती मिळताच मृतांच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला असून परिसरात शोकळा पसरली आहे. पोलिसांनी अपघाती मृत्यूची नोंद केली असून घटनेचा अधिक तपास सुरू आहे.



प्रशासनाचे आवाहन


पावसाळ्यात धरण परिसरात पाण्याची पातळी वाढलेली असते आणि प्रवाही तीव्र असतो त्यामुळे नागरिकांनी धरणात उतरणे टाळावे असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात आले आहे. गंगापूर धरणात वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे सुरक्षिततेसाठी उपाय योजना करण्याची मागणी स्थानिकांकडून होत आहे.

Comments
Add Comment

Santacruz Chembur Link Road Phase 2 : सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज खुला; वाकोला-बांद्रा-कुर्ला कॉम्प्लेक्स प्रवास होणार अधिक वेगवान

मुंबई : मुंबईतील वाहतूक कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने महत्त्वाचा असलेला सांताक्रुझ-चेंबूर लिंक रोड टप्पा-2 आज,

Supriya Sule and Vinod Tawde : सुप्रिया सुळे आणि विनोद तावडे बैठक सोडून अचानक निघाले, एका कारमधून गेले; चर्चेला उधाण

नवी दिल्ली : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार हा पक्ष एनडीएमध्ये सहभागी होणार असल्याची चर्चा सुरू असतानाच एक

Bike Rider Riddhi Thakkar: बाईक राइडिंगसाठी गेली, पण काळाने घात केला; मुंबईच्या 24 वर्षीय तरुणीचा भीषण अपघाती मृत्यू

मुंबई :  मुंबईतील (Mumbai) कांदिवली पश्चिम परिसरात राहणाऱ्या 24 वर्षीय रिद्धी ठक्करचा छत्तीसगडमधील धमतरी जिल्ह्यात

Bharat Gogawale : नाशिकला गिरीश महाजन आणि रायगडमध्ये भरत गोगावले करणार ध्वजारोहण

मुंबई : भारताच्या ८० व्या स्वातंत्र्यदिनाच्या शासकीय समारंभासाठी राज्य शासनाकडून जिल्हा निहाय ध्वजारोहण

Weather Update : महाराष्ट्रातील विविध भागांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता, हवामान खात्याचा अंदाज

मुंबई : राज्यात श्रावणाचं आगमन धो धो पावसानं होणार आहे. महाराष्ट्रातील विविध भागांत गुरुवार १३ ते शनिवार १५ ऑगस्ट

NEET Students Protest : नीट विद्यार्थी आंदोलनावर संसदेत चर्चेचे गृहमंत्री अमित शहा यांचे आव्हान

नवी दिल्ली : जंतरमंतर येथे झालेल्या विद्यार्थी आंदोलनावर आणि नीट पेपर फुटीप्रकरणावरून संसदेत आक्रमक झालेल्या