BMC Action : हॉटेलच्या मोकळ्या जागांचा अनधिकृत वापर

अंधेरीतील ‍हॉट्स युअर बहाना, ट्रोव्‍ह ९, ज्‍युलिएट व याझु या हॉटेलांचे वाढीव बांधकामांवर कारवाई


मुंबई : सेवा क्षेत्रासाठी मोकळ्या जागा सोडणे आवश्यक असतानाही ती अनधिकृतपणे बंदिस्त करून त्यांचा वापर करणाऱ्या हॉटेलविरोधात (Hotel) कठोर कारवाई करण्याचे निर्देश महापालिका अतिरिक्त आयुक्त (शहर) डॉ. अश्विनी जोशी यांनी दिले आहेत. या निर्देशानुसार संपूर्ण मुंबईत (Mumbai) कारवाई सुरू करण्यात आली आहे असून या अंतर्गत के पश्चिम विभाग कार्यालयाच्या वतीने अंधेरी पश्चिम येथील वीरा देसाई मार्ग आणि ऑफिस न्यू लिंक रोड परिसरातील नामांकित हॉटेलची वाढीव बांधकामे हटवण्यात आली आहे. तसेच वापरातील साहित्य जप्त करण्यात आले आहे.‍हॉट्स युअर बहाना, ट्रोव्‍ह ९, ज्‍युलिएट व याझु या हॉटेलचा त्‍यात समावेश आहे.



उपायुक्त (परिमंडळ ४) भाग्यश्री कापसे यांच्या मार्गदर्शनाखाली व सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मंगळवारी ९ जून २०२६ रोजी ही कारवाई केली. आरोग्य विभाग, अनुज्ञाप्ती विभाग , अग्निशमन विभाग व बांधकाम व कारखाना विभाग यांच्या संयुक्त पथकाद्वारे ही कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईदरम्यान आरोग्य व परवाना विभागामार्फत २४ खुर्च्या, १ कुकिंग रेंज (Cooking Range), मायक्रोवेव्ह ओव्हन (Microwave Oven), ३ कूलर्स (Coolers), १ इलेक्ट्रिक फ्रायर (Elecric Fire) व २ स्पीकर्स (Speakers) जप्त करण्यात आले. या कारवाईदरम्यान विभागीय अधिकारी-कर्मचारी, मजूर व अग्निशमन दलाचे कर्मचारी मिळून एकूण २० मनुष्यबळ तैनात करण्यात आले होते. तसेच, जेसीबी यंत्रसामग्रीचाही वापर करण्यात आला.


सहायक आयुक्त (के पश्चिम विभाग) चक्रपाणी अल्ले म्‍हणाले की, या हॉटेल व्यावसायिकांनी अनिवार्य मोकळ्या जागेवर अनधिकृतपणे आच्छादन करून सेवा क्षेत्राचा विस्तार केला होता . या हॉटेलांच्या अनधिकृत वाढीव बांधकामांवर कारवाई करण्यात आली असून, संबंधित साहित्यही जप्त करण्यात आले आहे. यापुढील काळातही अनधिकृत बांधकामावर कडक कारवाई सुरू राहणार असल्याचे चक्रपाणी अल्ले यांनी स्पष्ट केले आहे.

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि