Labour Minister Adv. Akash Fundkar : 'पॉश' कायद्याची परिणामकारक अंमलबजावणी करावी

कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर यांचे निर्देश


 

 

मुंबई : कामाच्या ठिकाणी महिलांचे लैंगिक छळापासून संरक्षण (प्रतिबंध, मनाई आणि निवारण) अधिनियम, २०१३ अर्थात 'पॉश ' च्या अधिक परिणामकारक अंमलबजावणी करावी, असे निर्देश कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी आज मंत्रालयात आयोजित बैठकीत दिले.या बैठकीस कामगार आयुक्त एच.पी तुम्मोड, उपसचिव रोशनी कदम, उपसचिव दीपक पोकळे, यशस्वी ग्रुपचे विश्वेश कुलकर्णी आदी उपस्थित होते.



कामगार मंत्री म्हणाले, या कायद्याच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी पथदर्शी व्यवस्था उभी करावी, अशी व्यवस्था असणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरणार आहे. या कायद्यातील तरतुदींनुसार ज्या आस्थापनांमध्ये १० किंवा १० पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत, तिथे 'अंतर्गत समिती' स्थापन करणे बंधनकारक आहे. खाजगी आस्थापनांमध्ये या समित्यांचे कामकाज योग्य रीतीने चालते की नाही, याची तपासणी करावी.या अंतर्गत समितीच्या अंतर्गत परीक्षणाची व्यवस्था उभारावी. त्यासाठी काही अभ्यासक्रम तयार करत येतो का याबाबत पडताळणी करावी. हा अभ्यासक्रम पूर्णपणे 'प्रमाणपत्र आधारित' असावा का, याबाबत कायदेविषयक बाबी तपासून अंतिम मसुदा तयार सादर करावा. महिलांना कामाच्या ठिकाणी सुरक्षित, भयमुक्त आणि सन्मानकारक वातावरण मिळणे हा त्यांचा हक्क आहे. २०१३ च्या कायद्याची केवळ औपचारिकता न राहता त्याची १०० टक्के कडक अंमलबजावणी व्हावी, अशा सूचनाही कामगार मंत्री ॲड फुंडकर यांनी दिल्या

Comments
Add Comment

Mumbai News : ईद-ए-मिलाद मिरवणुकीतील संघर्षानंतर प्रक्षोभक व्हिडिओ व्हायरल; काळाचौकी पोलिसांकडून दोन गुन्हे दाखल

मुंबई : मुंबईतील लालबाग-परेल परिसरात 26 ऑगस्ट रोजी ईद-ए-मिलाद-उन-नबीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या संघर्षानंतर

Petrol Diesel Price : महिन्याचा शेवट आणि खिशावर ताण? पेट्रोल भरण्याआधी पाहा तुमच्या शहरातील आजचे नवीन दर!

मुंबई : सरकारी तेल कंपन्यांनी देशभरातील पेट्रोल आणि डिझेलचे आजचे दर जाहीर केले आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारातील

Bandra Hit And Run : भरधाव कारची 8 वर्षीय मुलाला धडक; उपचारांपूर्वीच मृत्यू, महिला चालकाला अटक

मुंबई : मुंबईतील वांद्रे पश्चिम परिसरात झालेल्या भीषण अपघातात 8 वर्षीय अंश गुप्ता या चिमुकल्याचा मृत्यू झाला.

Mumbai Bandra road accident : मुंबईत भरधाव इनोव्हाने मुलाला चिरडलं, लहानग्याच्या छातीवर चालवली गाडी

मुंबई : मुंबईतून अपघाताची बातमी आली आहे. भरधाव इनोव्हा गाडीने नऊ वर्षांच्या मुलाला चिरडले. मेहबूब स्टुडिओ जवळ हा

Indian Railway : रेल्वे प्रवाशांनो लक्ष द्या! स्टेशनवर थुंकणे, कचरा टाकणे आता महागात पडणार; थेट ₹१,००० दंड

मुंबई : रेल्वेने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी आहे. रेल्वे स्थानक किंवा परिसरात अस्वच्छता

Mumbai Parelcha Maharaja : परळच्या महाराजाच्या आगमन मिरवणुकीत विजेच्या खांबाला आग; भाविकांमध्ये एकच घबराट  

Mumbai : मुंबईत आगामी गणेशोत्सवाचा उत्साह आता पुरेसा शिगेला पोहोचला असून, शनिवारी पार पडलेल्या 'परळचा महाराजा' आणि