Chhagan Bhujbal : राजकारणात काहीजण कष्ट न करताही पुढे जातात!

मंत्री छगन भुजबळ यांचा पक्षांतर्गत विरोधकांना टोला; राष्ट्रवादीच्या वर्धापनदिन कार्यक्रमात सूचक विधान


मुंबई : "पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ता महत्त्वाचा असतो. राष्ट्रवादीच्या स्थापनेपासून गेल्या २६ वर्षांच्या राजकारणात अनेक जण मेहनतीने पुढे आले आहेत, सगळेच कष्ट करत असतात. मात्र, काहीजण कष्ट न करता देखील पुढे जातात", अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी बुधवारी पक्षांतर्गत विरोधकांना टोला लगावला. राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) २७ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात बोलताना त्यांनी हे विधान केले. राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यामुळे भुजबळ नाराज असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच, त्यांच्या या वक्तव्याचा रोख नेमका कोणाकडे आहे, यावरून आता तर्कवितर्कांना उधाण आले आहे.


राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात आयोजित वर्धापनदिन सोहळ्यात भुजबळ यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. या वेळी बोलताना, "आपापसात मतभेद होतात तेव्हा आपण घर सोडत नाही, तर आपली मते मांडतो," असे सांगत भुजबळ यांनी पक्षातच राहून संघर्ष करण्याचे संकेत दिले. तसेच, "नमस्कार ताकदीला आणि चमत्काराला होतो. तुमच्या पाठीमागे आमदार, खासदार आणि नगरसेवक किती आहेत, यावरच राजकारणात सगळे काही अवलंबून असते," असे सांगत त्यांनी सत्तेच्या समीकरणांवरही भाष्य केले. या वेळी त्यांनी पक्षाच्या सुरुवातीच्या काळातील आठवणींना उजाळा देत दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांना श्रद्धांजली वाहिली.



छगन भुजबळ हे राज्यसभेवर जाण्यासाठी उत्सुक होते, मात्र त्यांनी आपले पुतणे समीर भुजबळ यांना राज्य मंत्रिमंडळात घेण्याची अट घातली होती. भाजपकडून यावर तातडीने निर्णय न झाल्याने भुजबळ यांनी राज्यसभेची उमेदवारी नाकारली आणि पक्षाने राजेंद्र जैन यांना संसदेत पाठवले. या घडामोडींनंतर, "पक्षातील इतर नेत्यांच्या मुलाबाळांना जो न्याय मिळतो, तोच मलाही मिळावा," अशी उघड इच्छा भुजबळ यांनी बोलून दाखवली होती. त्यातच आता 'कष्ट न करता पुढे जाणाऱ्यां'बाबत त्यांनी केलेले विधान याच पार्श्वभूमीवर असल्याचे मानले जात आहे. या कार्यक्रमाला ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, नवाब मलिक, खासदार राजेंद्र जैन यांच्यासह पक्षाचे प्रमुख आमदार व पदाधिकारी उपस्थित होते.



माध्यमांशी संवाद साधताना सावध भूमिका


या कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना भुजबळ यांनी सावध पवित्रा घेतला. "माझे वक्तव्य तोडूनमोडून दाखवू नका. पक्षात अनेक जण कष्ट करून पुढे आले आहेत. अजित पवार पक्षाबाहेर पडल्यानंतर सुनेत्रा वहिनी पुढे आल्या. पदं मर्यादित असल्याने अनेकांना आपल्याला काही मिळाले नाही असे वाटते, पण पक्षाने प्रत्येकाला न्याय देण्याचे काम केले आहे. सर्वांनी एकजुटीने काम करावे, हाच माझ्या बोलण्याचा उद्देश होता," असे स्पष्टीकरण त्यांनी दिले.



गिरगावमधील 'त्या' विकासकाशी संबंध नाही


गिरगावमधील एका जागेच्या प्रकरणात मालकाला भेटण्यासाठी छगन भुजबळ यांच्या शासकीय बंगल्याच्या पत्त्यावर जाहीर नोटीस (Notice) प्रसिद्ध झाली होती. या वादावर स्पष्टीकरण देताना भुजबळ म्हणाले, "संबंधित विकासकाशी किंवा जाहिरातीशी आमचा काहीही संबंध नाही. आमच्या शासकीय निवासस्थानाच्या आवारात धोबी समाजातील आमचे एक बांधव राहतात. त्यांचा मुलगा नुकताच वकील झाला असून, त्यानेच ही जाहिरात देऊन बंगल्याचा पत्ता टाकला होता. मलबार हिल पोलिसांनी याप्रकरणी तपास करून संबंधितांना ताब्यात घेतले आहे. पोलिसांच्या चौकशीत सत्य समोर येईलच."

Comments
Add Comment

Delhi Gang Rape : धक्कादायक! दिल्लीतील स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार; चालक आणि वाहकाला अटक

नवी दिल्ली : दिल्लीच्या काश्मिरी गेट परिसरात स्लीपर बसमध्ये 16 वर्षीय विद्यार्थिनीवर सामूहिक अत्याचार झाल्याची

Nashik : नोकरीचे आमिष दाखवले अन् ३ लाख ३० हजार उकळले, गुन्हा दाखल

Nashik : नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुक्यातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. कायमस्वरूपी नोकरी देण्याचे आमिष दाखवून

India vs Thailand Women T20 Asia Cup 2026 : भारताचा थायलंडवर ९४ धावांनी दणदणीत विजय; शेफाली वर्माची तुफानी खेळी

दुबई : महिला टी-२० आशिया कप २०२६च्या सलामीच्या सामन्यात भारतीय महिला क्रिकेट संघाने थायलंडचा ९४ धावांनी पराभव

Dhirendra Pratap Singh Murder Case : धीरेंद्र प्रताप सिंह हत्या प्रकरणात नवा ट्विस्ट; जवळच्याच व्यक्तीने आखला हत्येचा कट

लखनऊ : उत्तर प्रदेशची राजधानी लखनऊमध्ये महाराणा प्रताप चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष धीरेंद्र प्रताप सिंह (४५)

Gold Rate Today : ग्राहकांना सोन्यासारखी संधी! बाजारात सोन्याचे दर घसरले; पहा तुमच्या शहरातील आजचे ताजे दर

मुंबई : गेल्या काही दिवसांपासून सोन्या-चांदीच्या दरात चढ-उतार पाहायला मिळत आहेत. त्यातच सोन्याच्या दरात सलग

Nashik : वीज चोरी प्रकरणांतील कामात हलगर्जीपणा नडला, महावितरणचे कार्यकारी अभियंता निलंबित

Nashik : १ कोटी ४६ लाख रुपयांच्या औद्योगिक वीज चोरी प्रकरणातील वसुली आणि कायदेशीर कारवाईचे प्रकरण रेंगाळत ठेवणे, तसेच