जळगाव: जळगाव (Jalgaon) जिल्ह्यातील जामनेर (Jamner) येथे एक धक्कादायक घटना समोर आली आहे. मुलीचा साखरपुडा अवघ्या काही दिवसांवर आला असताना एका महिलेने घर सोडून प्रियकरासोबत लग्न केल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे कुटुंबीयांना मोठा धक्का बसला असून परिसरातही या घटनेची चर्चा सुरू आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जामनेरमधील एका कुटुंबात येत्या गुरुवारी मुलीचा साखरपुडा होणार होता. त्यासाठी घरात जोरदार तयारी सुरू होती. नातेवाईकांचे येणे-जाणे वाढले होते. मात्र, दोन दिवसांपूर्वी घरातील महिला कोणालाही न सांगता अचानक घरातून निघून गेली. कुटुंबीयांनी तिचा शोध घेतला, परंतु तिच्याबाबत कोणतीही माहिती मिळाली नाही.
Nashik : शाळेचा पहिला दिवस म्हटलं की शाळेतून मिळणारी नवी कोरी पुस्तके समोर येतात. पण नाशिकच्या शाळांना यंदा पुस्तके मिळण्याचे गणित जरा अवघड दिसतंय. ...
स्टेटसवर ती पोस्ट केली अन् भांडाफोड झाला
दरम्यान, दुसऱ्याच दिवशी संबंधित महिलेच्या प्रियकराने आपल्या मोबाईल स्टेटसवर दोघांच्या लग्नाचे फोटो पोस्ट केले. हे फोटो पाहताच कुटुंबीयांना धक्का बसला. मुलीच्या साखरपुड्याच्या तयारीत असलेल्या कुटुंबावर या घटनेमुळे मोठे संकट ओढवले.
पत्नीने प्रियकरासोबत लग्न केल्याचे फोटो पाहिल्यानंतर महिलेच्या पतीने जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेतली. समाजात बदनामी होत असल्याची तक्रार करत त्याने पोलिसांकडे मदत मागितली. तसेच पत्नी आणि तिच्या प्रियकराला सोशल मीडियावरील लग्नाचे स्टेटस हटवण्यास सांगावे, अशी विनंतीही केली.
पोलिसांनी तक्रारीची दखल घेत संबंधित प्रियकराला पोलीस ठाण्यात बोलावून समज दिली. मात्र, या प्रकरणात अद्याप कोणताही गुन्हा दाखल करण्यात आलेला नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या या घटनेची परिसरात जोरदार चर्चा सुरू आहे.






