देशातील सार्वजनिक क्षेत्रातील प्रमुख बँकांपैकी एक असलेल्या कॅनरा बँकेला रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) मोठा दणका दिला आहे. केवायसी (KYC) आणि निष्क्रिय खात्यांबाबतच्या नियामक नियमांचे पालन करण्यात त्रुटी आढळल्याने आरबीआयने बँकेवर ४१.८० लाख रुपयांचा आर्थिक दंड ठोठावला आहे. यासंदर्भातील आदेश 5 जून रोजी जारी करण्यात आला असून आरबीआयने अधिकृत प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली आहे. (RBI Imposes Penalty on Canara Bank)
कोणत्या कारणामुळे झाली कारवाई?
आरबीआयने ३१ मार्च २०२५ रोजीच्या आर्थिक स्थितीच्या आधारे कॅनरा बँकेची वैधानिक तपासणी (Statutory Inspection) केली होती. या तपासणीत बँकेकडून काही महत्त्वाच्या नियामक सूचनांचे पालन करण्यात आले नसल्याचे आढळून आले. तपासादरम्यान असे निदर्शनास आले की, काही ग्राहकांची KYC माहिती निर्धारित कालावधीत सेंट्रल KYC रेकॉर्ड्स रजिस्ट्री (CKYCR) मध्ये अपलोड करण्यात आलेली नव्हती. तसेच काही खातेदारांनी एका वर्षाच्या आत व्यवहार केलेले असतानाही त्यांची खाती 'इनऑपरेटिव्ह' (निष्क्रिय) म्हणून वर्गीकृत करण्यात आली होती. या बाबी आरबीआयच्या मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन असल्याचे मानत केंद्रीय बँकेने कॅनरा बँकेला कारणे दाखवा नोटीस बजावली होती. बँकेचे स्पष्टीकरण आणि उपलब्ध कागदपत्रांची तपासणी केल्यानंतर अखेर दंडात्मक कारवाईचा निर्णय घेण्यात आला. (RBI Imposes Penalty on Canara Bank)
मुंबई : पश्चिम आशियातील संकट, वाढती महागाई आणि ‘मॉन्सून’वर ‘एल निनो’चे सावट आदी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारतीय रिझर्व्ह बँकेने ‘तटस्थ’ ...
बँकिंग नियमन कायद्यांतर्गत कारवाई :
आरबीआयने बँकिंग रेग्युलेशन अॅक्ट, १९४९ अंतर्गत मिळालेल्या अधिकारांचा वापर करत ही कारवाई केली आहे. सेक्शन ४७A(1)(c) तसेच सेक्शन ४६(4)(i) अंतर्गत कॅनरा बँकेवर ४१.८० लाख रुपयांचा दंड लावण्यात आला आहे. मात्र, आरबीआयने स्पष्ट केले आहे की ही कारवाई केवळ नियामक अनुपालनातील (Regulatory Compliance) त्रुटींशी संबंधित आहे. याचा बँकेच्या ग्राहकांच्या व्यवहारांवर किंवा ठेवींवर कोणताही परिणाम होणार नाही. (RBI Imposes Penalty on Canara Bank)
आणखी एका कंपनीवरही दंड :
डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन यांची पुनर्नियुक्ती :
आरबीआयशी संबंधित आणखी एका महत्त्वाच्या निर्णयात डेप्युटी गव्हर्नर स्वामीनाथन जानकीरामन यांची पुन्हा नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांचा कार्यकाळ पुढील दोन वर्षांसाठी वाढवण्यात आला असून केंद्रीय बँकेच्या नेतृत्वातील सातत्य कायम राहणार आहे. (RBI Imposes Penalty on Canara Bank)
रेपो दराबाबतही महत्त्वाचा निर्णय :
याच आठवड्यात आरबीआयने आपले पतधोरण जाहीर करत रेपो दरात कोणताही बदल केलेला नाही. जागतिक आर्थिक अनिश्चितता, भू-राजकीय तणाव आणि महागाईच्या संभाव्य दबावाच्या पार्श्वभूमीवर रेपो दर ५.२५ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. सलग तिसऱ्यांदा रेपो दर स्थिर ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. (RBI Imposes Penalty on Canara Bank)
मुंबई : ‘ब्लूमबर्ग बिलियनेअर्स इंडेक्स’च्या ताज्या अहवालानुसार, या वर्षात जानेवारी महिन्यापासून ते ४ जून २०२६ पर्यंत भारतातील दिग्गज उद्योगपती गौतम ...
प्लास्टिक नोटांबाबत उत्सुकता वाढली :
आरबीआयचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी प्लास्टिक नोटांच्या प्रस्तावाबाबतही महत्त्वाचे वक्तव्य केले आहे. प्लास्टिक नोटा जारी करण्याचा विषय सध्या प्राथमिक आणि विचाराधीन टप्प्यात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे भविष्यात भारतीय चलनात प्लास्टिक नोटा दिसणार का, याबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. (RBI Imposes Penalty on Canara Bank)






