पुणे : शहरातील खराडी परिसरातील खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी इमारतीत शुक्रवारी सकाळी झालेल्या LPG Cylinder Blast मुळे भीषण आग (Fire) लागून एकाचा मृत्यू झाला, तर एकाच कुटुंबातील अन्य दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही दुर्घटना सकाळी ९:१५ सुमारास घडली असून परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खांदवेनगर येथील फॉर्च्युन सिटी इमारतीच्या पहिल्या मजल्यावरील फ्लॅटमध्ये आग लागल्याची माहिती सकाळी ९:१५ वाजता नागरिकांनी Fire Brigade ला दिली. त्यानंतर खराडी, धानोरी आणि येरवडा येथून तीन अग्निशमन वाहने तातडीने घटनास्थळी रवाना करण्यात आली. तळमजला आणि पहिला मजला असलेल्या इमारतीतील फ्लॅटमध्ये आग वेगाने पसरली होती.
मुंबई उपनगरचे पालकमंत्री आशिष शेलार यांची घोषणा मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतून राज्यभर राबविण्यात येणाऱ्या ‘हरित ...
प्राथमिक माहितीनुसार, घरातील जुना LPG Gas Cylinder संपल्यानंतर नवीन सिलेंडर जोडताना गॅस लीक (Gas Leak) झाला. त्यानंतर झालेल्या भीषण स्फोटामुळे (Explosion) घराला आग लागली. अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ बचावकार्य सुरू करत होजपाईपच्या सहाय्याने आग नियंत्रणात आणली.
या दुर्घटनेत विष्णू गीते (६०), रुंदीवनिका विष्णू गीते (५०) आणि पांडुरंग विष्णू गीते (३५) हे गंभीर जखमी झाले. तिघांनाही उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यापैकी एकाचा ससून रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. उर्वरित दोघांची प्रकृती गंभीर असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
Jalgaon Crime : जळगाव जिल्ह्यातील बोरखेडा (ता. रावेर) येथे घडलेल्या चार निष्पाप बालकांच्या निर्घृण हत्याकांड आणि अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणी विशेष ...
दरम्यान, अग्निशमन दलाने आग पूर्णपणे विझवून Cooling Operation पूर्ण केले. या आगीत फ्लॅटमधील हॉल पूर्णपणे जळून खाक झाला. फर्निचर, टीव्ही, विद्युत वायरिंग, बाथरूम व टॉयलेटचे दरवाजे, गिझर यांचे मोठे नुकसान झाले. तसेच स्वयंपाकघरातील फ्रिज आणि इतर घरगुती साहित्यही आगीत नष्ट झाले. धुरामुळे संपूर्ण फ्लॅटच्या भिंती काळ्या पडल्या असून मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.






