Monsoon 2026 : आनंदाची बातमी, मान्सून गोव्यात पोहोचला

लवकरच महाराष्ट्राच्या दक्षिण किनारपट्टीवर धडकणार


पणजी : मान्सून गुरुवारी केरळमध्ये दाखल झाला असून सध्या मान्सूनचा उत्तरेकडे प्रवास सुरू आहे. दरम्यान, मान्सूनचे शुक्रवारी गोव्याच्या काही भागात आगामन झाल्याची माहिती हवामान विभागाने दिली. सध्या मान्सून महाराष्ट्राच्या वेशीपर्यंत पोहोचला आहे. लवकरच तळकोकणात मान्सूनचे आगमन होईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.सॅटेलाईट प्रतिमांमध्ये केरळ किनारपट्टी, कर्नाटक आणि गोव्याच्या संपूर्ण किनापट्टीवर शुक्रवारी सकाळी दाट ढगांची दाटी दिसून येत होती. त्यामुळे हळूहळू मान्सून पुढे सरकत असल्याचे दिसून येत होते. दुपारी मान्सून कर्नाटक, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागराच्या आणखी काही भागांमध्ये पुढे सरकल्याची माहिती हवामान विभागाकडून देण्यात आली. यात मान्सूनने अरबी समुद्राच्या आणखी काही भागांसह गोव्यातील काही भागांतही प्रवेश केला आहे. पुढील २ ते ३ दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्र, कर्नाटक, महाराष्ट्र आणि आंध्र प्रदेशातील काही भाग, गोवा, तामिळनाडू तसेच नैऋत्य बंगालच्या उपसागरातील उर्वरित भाग, ईशान्य बंगालच्या उपसागरातील आणखी काही भाग तसेच ईशान्य भारतातील काही राज्यांमध्ये आणखी पुढे सरकण्यासाठी हवामान स्थिती अनुकूल आहे.



मान्सून गोव्यात दाखल झाला की मान्सूनच्या पुढील प्रवासाचा टप्पा हा तळकोकण मानला जातो. लवकरच मान्सून राज्यात प्रवेश करणार असून त्यामुळे तळकोकणातील काही भागात पावसाची तीव्रता वाढण्याचा अंदाज आहे. कोल्हापूर आणि कोल्हापूर घाट विभाग आदी भागांसह सातारा आणि सातारा घाट विभाग तसेच नाशिक, अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, बीड, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, लातूर आणि नांदेड आदी भागातही वादळी पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. गेल्या वर्षी २४ मे रोजी केरळ येथे दाखल झालेला मान्सून २५ मे रोजी तळकोकणात दाखल झाला होता. तर मुंबई येथे २६ मे रोजी मान्सूनचे आगमन झाले होते. यंदा केरळमध्ये दाखल झालेला पाऊस राज्याच्या वेशीपर्यंत येऊन पोहोचला आहे.

Comments
Add Comment

Artificial Intelligence : शिक्षणात AI चा वाढता प्रभाव, भारताची शैक्षणिक व्यवस्था आता बदलणार

मुंबई : AI आता फक्त तंत्रज्ञान क्षेत्रापुरतं मर्यादित राहिलेलं नाही. ते थेट वर्गखोल्यांपर्यंत पोहोचलं आहे. पण

Kashmiri Pandit Threat Letter : काश्मिरी पंडितांना १५ दिवसांत दुसऱ्यांदा धमकीचं पत्र; वैयक्तिक माहिती व्हायरल, सुरक्षा यंत्रणा सतर्क

काश्मीर : जम्मू-काश्मीरमधील काश्मिरी पंडितांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. काश्मिरी

Tamil Nadu Gold Ring Scheme : ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर; ७५५ कोटींचा खर्च, ‘या’ बाळांना मिळणार १ ग्रॅम सोनं!

चेन्नई : तामिळनाडू सरकारने तब्बल ४.४१ लाख सोन्याच्या अंगठ्यांची ऑर्डर दिल्याने सध्या या निर्णयाची चर्चा सुरू

INS Mangrol : ‘आयएनएस मंगरोल'मुळे नौदलाची ताकद वाढली; पाण्याखालील शत्रूंच्या हालचालींवर ठेवणार नजर!

नवी दिल्ली : भारतीय नौदलाची सागरी ताकद आणखी वाढली आहे. स्वदेशी बनावटीची ‘आयएनएस मंगरोल’ (INS Mangrol) ही पाणबुडीविरोधी

National Teacher Award 2026 : उच्च शिक्षण - तंत्रनिकेतन क्षेत्रातील राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर, महाराष्ट्रातील तीन प्राध्यापकांचा समावेश

नवी दिल्ली : देशभरातील उच्च शिक्षण आणि तंत्रनिकेतन क्षेत्रात उल्लेखनीय योगदान देणाऱ्या २१

Miss Universe India 2026 : कौतुकास्पद! केरळच्या केझिया लिझ मेजोने पटकावला ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा किताब

Miss Universe India 2026 : केरळची सौंदर्यवती केझिया लिझ मेजो हिने ‘मिस युनिव्हर्स इंडिया 2026’चा प्रतिष्ठित किताब पटकावला आहे. 23