Participate Mumbai BMC CSR Portal : मुंबईचा विकास आता 'डिजिटल' मार्गाने, मनपाकडून 'पार्टिसिपेट मुंबई'ची घोषणा

मुंबई : मुंबईच्या विकासकामांमध्ये नागरिक, स्वयंसेवी संस्था आणि कॉर्पोरेट क्षेत्राचा अधिकाधिक सहभाग वाढवण्यासाठी मुंबई महापालिका ‘पार्टिसिपेट मुंबई’ हा महत्त्वाकांक्षी डिजिटल उपक्रम राबविणार आहे. या माध्यमातून विविध सामाजिक आणि विकासात्मक प्रकल्पांसाठी स्वयंसेवक, सामाजिक संस्था आणि सीएसआर निधी उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करण्यात येणार आहे.



महापालिकेच्या विविध विभागांच्या गरजा, प्रकल्प आणि सामाजिक उपक्रम यांना नागरिकांच्या सहभागाची जोड देत शहर विकासाची नवी संकल्पना प्रत्यक्षात आणण्याचा हा प्रयत्न मानला जात आहे. समाजासाठी काम करण्याची इच्छा असलेल्या अनेक व्यक्तींना शहरातील नेमक्या कोणत्या समस्या प्राधान्याने सोडविण्याची गरज आहे किंवा त्यांचे कौशल्य, वेळ आणि संसाधने कुठे उपयोगी पडू शकतात, याची माहिती मिळत नाही. ‘पार्टिसिपेट मुंबई’ हे व्यासपीठ ही दरी भरून काढणार आहे. या प्लॅटफॉर्मद्वारे नागरिकांना स्वच्छता मोहिमा, वृक्षारोपण, आरोग्य शिबिरे, शिक्षण सहाय्य, जनजागृती अभियान यांसारख्या विविध सामाजिक उपक्रमांमध्ये त्यांच्या आवडी व कौशल्यानुसार सहभाग नोंदविता येणार आहे.




हा उपक्रम केवळ स्वयंसेवा उपक्रमांपुरता मर्यादित राहणार नाही. सामाजिक योगदान कार्यक्रम, आवश्यक वस्तूंचे संकलन, आपत्ती व्यवस्थापन सहाय्य, सामाजिक जनजागृती मोहीम आणि विविध विकास प्रकल्पांसाठीही हे प्रभावी व्यासपीठ म्हणून काम करणार आहे. महापालिकेचे विविध विभाग आपल्या गरजा आणि प्रकल्पांचे तपशील या प्लॅटफॉर्मवर अपलोड करतील. त्यानंतर स्वयंसेवी संस्था, नागरिक गट किंवा कॉर्पोरेट कंपन्या संबंधित प्रकल्पांमध्ये सहभागी होण्यासाठी आपली स्वारस्य नोंदवू शकतील. या महत्त्वाकांक्षी उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी महापालिकेने तांत्रिक व्यवस्थापन सल्लागार म्हणून अर्न्स्ट अँड यंग एलएलपी (ईवाय) या संस्थेची नियुक्ती करण्याचा निर्णय घेतला आहे. या संस्थेच्या मदतीने डिजिटल व्यासपीठाची रचना, कार्यपद्धती आणि अंमलबजावणीची प्रक्रिया विकसित केली जाणार आहे.


पारदर्शकता आणि रिअल-टाइम मॉनिटरिंग


‘पार्टिसिपेट मुंबई’मध्ये सर्व उपक्रम, निधी, स्वयंसेवक, प्रकल्पांची प्रगती आणि आवश्यकतांची माहिती एकाच डिजिटल प्लॅटफॉर्मवर उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे प्रक्रियेत पारदर्शकता वाढेल आणि विविध घटकांमध्ये विश्वास निर्माण होण्यास मदत होईल. रिअल-टाइम मॉनिटरिंग आणि अहवाल प्रणालीमुळे दाते, स्वयंसेवक आणि नागरिकांना त्यांच्या योगदानाचा प्रत्यक्ष परिणाम पाहता येणार आहे.

Comments
Add Comment

Arun Datte : गुरुत्वाकर्षणालाही चकवणारी कला!

मूर्तिकार अरुण दत्ते या वर्षी काय नवा 'बॅलन्स' साधणार ? मुंबई : गणेशोत्सवाचे वेध सर्वत्र लागले असून यंदाच्या

Makarand Jadhav-Patil : नैसर्गिक आपत्तीग्रस्त शेतकऱ्यांना ८६.६५ कोटींची मदत; मंत्री मकरंद जाधव-पाटील

नाशिक विभागातील नाशिक, अहिल्यानगर व जळगाव जिल्ह्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई : “खरीप २०२५ मध्ये

Hasan Mushrif : किडनी, यकृत प्रत्यारोपणाच्या सुविधा शासकीय रुग्णालयांत वाढविण्यावर भर द्या; वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ

मुंबई : राज्यातील गरजू रुग्णांना किडनी व यकृत प्रत्यारोपणाची सुविधा शासकीय रुग्णालयांमध्ये उपलब्ध करून

Bharat Gogawale : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कामांना गती द्या; मंत्री भरत गोगावले

मुंबई : ‘व्हीबी जी राम जी’ योजनेच्या माध्यमातून राज्यातील गरजू नागरिकांना अधिकाधिक रोजगार उपलब्ध करून

Prabhadevi Water Pipeline : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटली

मुंबई : प्रभादेवीत एलफिन्स्टन पुलाजवळ जलवाहिनी फुटल्यामुळे हजारो लिटर पाणी वाहून गेले. सेनापती बापट मार्गावर ही

Arrested for throwing eggs : माझगावच्या मोरया गणपतीच्या मिरवणुकीवर अंडी फेकल्याप्रकरणी दानिश शेर खानला अटक, भायखळा पोलिसांची कारवाई

Mumbai : २३ ऑगस्ट रोजी माझगावच्या मोरया गणपती मंडळाच्या मिरवणुकीत अंडी फेकल्याच्या आरोपानंतर मुंबईच्या भायखळा