Me Savitribai Jotirao Phule : 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप; डॉ. अमोल कोल्हेंनी सांगितले बंद होण्यामागचे कारण

स्टार प्रवाह वाहिनीवरील लोकप्रिय 'मी सावित्रीबाई जोतीराव फुले' ही मालिका लवकरच प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे. गेल्या काही दिवसांपासून मालिकेबाबत विविध चर्चा सुरू होत्या. अखेर मालिकेचे निर्माते आणि अभिनेते डॉ. अमोल कोल्हे यांनी स्वतः याबाबत माहिती दिली आहे. १४ जून रोजी या मालिकेचा शेवटचा भाग प्रसारित होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.

सावित्रीबाई फुले आणि महात्मा जोतीराव फुले यांच्या जीवनकार्यावर आधारित ही मालिका प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली होती. समाजातील अंधश्रद्धा, जातीय भेदभाव आणि शिक्षणाचा अभाव याविरोधात फुले दाम्पत्याने दिलेला लढा या मालिकेतून दाखवण्यात आला. मात्र आता त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावरच ही मालिका संपणार आहे.

डॉ. अमोल कोल्हे यांनी सांगितले की, मालिका बंद करण्याचा निर्णय वाहिनीचा आहे. मालिकेच्या निर्मितीसाठी होणारा खर्च आणि मिळणारे उत्पन्न यामध्ये समतोल राहत नसल्याने हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांना कळवण्यात आले. सध्या सुरू असलेल्या कालखंडापर्यंतच कथा दाखवण्याचे ठरवण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

मालिका संपत असल्याबद्दल खंत व्यक्त करताना त्यांनी फुले दाम्पत्याच्या कार्याचा उल्लेख केला. शिक्षण क्षेत्रात मोठे योगदान देणाऱ्या या महान व्यक्तींच्या जीवनावरील मालिका इतक्या कमी भागांमध्ये संपत असल्याचे दुर्दैवी असल्याचे त्यांनी म्हटले. त्यांच्या विचारांची आणि कार्याची अधिक व्यापक मांडणी होणे आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले.

दरम्यान, मालिका बंद होत असली तरी फुले दाम्पत्याची कथा इथेच थांबणार नसल्याचे डॉ. कोल्हे यांनी स्पष्ट केले आहे. भविष्यात एका नव्या माध्यमातून आणि वेगळ्या स्वरूपात ही कथा पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यामुळे या विषयावर आधारित नवा प्रकल्प लवकरच पाहायला मिळण्याची शक्यता आहे. मालिका बंद होणार असल्याची चर्चा सुरु असल्याने सोशल मीडियावर अनेकांनी खंत व्यक्त केली आहे.
Comments
Add Comment

Heart Attack : सलमान खानच्या घराबाहेर बंदोबस्तात असलेल्या पोलिसाचा मृत्यू; ड्युटीवर असताना हृदयविकाराचा झटका

मुंबई: बॉलिवूड अभिनेता सलमान खानच्या वांद्रे येथील 'गॅलेक्सी अपार्टमेंट' या निवासस्थानाबाहेर सुरक्षेसाठी

Awarapan 2 Songs : 'आवारापन २'च्या गाण्यांसाठी सईद काद्री यांच्यावर प्रचंड दडपण; 'तो फिर आओ'ची जादू पुन्हा अनुभवता येणार!

बॉलिवूडमधील अत्यंत लोकप्रिय ठरलेला 'आवारापन' (Awarapan) हा चित्रपट आता एका नव्या सिक्वलसह प्रेक्षकांच्या भेटीस

Aishwarya Harishankar : सोशल मीडियावर ट्रेंडिंग असलेल्या 'माझ्या सोन्या' गाण्यातील प्रसिद्ध अभिनेत्री ऐश्वर्या हरिशंकर नक्की आहे तरी कोण?

मुंबई : मराठी आणि हिंदी मनोरंजनसृष्टीत वेगाने आपली ओळख निर्माण करणाऱ्या अभिनेत्री, निर्माती आणि डिजिटल कंटेंट

Sara Tendulkar : प्रेक्षकांचे वेधले लक्ष; सारा तेंडुलकरचा स्पेन मधील ग्लॅमरस लुक

भारतीय क्रिकेटचा दिग्गज खेळाडू सचिन तेंडुलकर याची मुलगी सारा तेंडुलकर ही सोशल मीडियावरील सर्वाधिक चर्चेत

Avika Gor hospitalized : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री अविका गोर डेंग्यूच्या विळख्यात; प्रकृती खालावल्याने रुग्णालयात दाखल

लोकप्रिय टेलिव्हिजन मालिका 'बालिका वधू' मधील 'आनंदी' या भूमिकेमुळे घरोघरात पोहोचलेली प्रसिद्ध अभिनेत्री अविका

Lock Upp : 'लॉक अप सीझन २'ची विजेती श्रेया कालराचा मोठा निर्णय; १ कोटींच्या प्राइझ मनीबाबत केली मोठी घोषणा

ओटीटीवरील लोकप्रिय आणि वादग्रस्त रिॲलिटी शो 'लॉक अप सीझन २'चा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. बुधवारी झालेल्या