Monday, June 1, 2026

Cricket : आयसीसीच्या निर्णयामुळे क्रिकेट बदलणार, खेळातली चुरस आणखी वाढणार

Cricket : आयसीसीच्या निर्णयामुळे क्रिकेट बदलणार, खेळातली चुरस आणखी वाढणार

दुबई : आयसीसीने क्रिकेटच्या निवडक नियमांमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतला आहे. या बदलांमुळे क्रिकेटमधील चुरस आणखी वाढणार आहे.

कसोटी क्रिकेटमध्ये दोन्ही संघांच्या कर्णधारांची संमती असल्यास सामना सुरू असताना लाल चेंडूऐवजी गुलाबी चेंडू वापरता येणार आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे वाया जाणारा वेळ कमी करण्यासाठी आयसीसीने हा नवा नियम केला आहे.

कसोटी सामन्यात अपुऱ्या प्रकाशामुळे सामन्यात व्यत्यय आला तर दोन्ही संघांच्या कर्णधारांच्या संमतीने पुरेसा प्रकाश येईपर्यंत अथवा दिवसाचा खेळ संपेपर्यंत लालऐवजी गुलाबी चेंडू वापरता येणार आहे. अपुऱ्या प्रकाशामुळे वेळ वाया जाऊ नये यासा

">ठी हा नियम आयसीसीने केला आहे. पण हा नियम लागू करण्यासाठी आयसीसीने एक विशेष अट घातली आहे. दोन्ही संघांच्या क्रिकेट बोर्डांनी संमती दिली तरच अपुरा प्रकाश असताना पंच कसोटी सामन्यात लाल ऐवजी गुलाबी चेंडू वापरण्यासाठी दोन्ही कर्णधारांची परवानगी विचारणार आहेत. दोन्ही कर्णधारांनी परवानगी दिली तरच कसोटी सामन्यात पुरेसा प्रकाश येईपर्यंत अथवा दिवसाचा खेळ संपेपर्यंत लालऐवजी गुलाबी चेंडू वापरता येणार आहे. आयसीसीचा नवा नियम फ्लडलाइट्सने सुसज्ज असलेल्या मैदानांमध्ये पारंपरिक कसोटी सामन्यांना लागू होणार आहे. दिवस-रात्र सामने गुलाबी चेंडूने खेळले जाणे सुरूच राहील. तसेच आयसीसीने एमसीसीच्या सहकार्याने प्रकाश तंत्रज्ञानावरील संशोधनासाठी निधी देण्याच्या योजनेलाही सहमती दर्शवली आहे.

आयसीसीच्या आणखी एका नव्या नियमानुसार एकदिवसीय आणि टी20 क्रिकेटमध्ये ड्रिंक्स ब्रेक दरम्यान मुख्य प्रशिक्षक किंवा निवडक कर्मचाऱ्यांना मैदानावर येण्याची परवानगी मिळणार आहे. आतापर्यंत, फक्त ड्रिंक्स हाताळणारे खेळाडूच ड्रेसिंग रूममधून संदेश पाठवू शकत होते. या व्यतिरिक्त टी20आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये आता दोन डावांच्या मध्ये १५ मिनिटांचा ब्रेक असेल आणि खेळ पुन्हा सुरू झाल्यावर फलंदाजांना तयार राहावे लागेल. या निर्णयामुळे सामने लवकर संपण्यास मदत होणार आहे.

आयसीसीने लेग साईड वाईड ट्रायललाही मंजुरी दिली आहे. तसेच हॉक आय तंत्राची मदत घेऊन बॉलिंग अॅक्शनवर आलेल्या आक्षेपांविषयी निर्णय देण्याचा निर्णय घेतला आहे.

या व्यतिरिक्त आयसीसीने जून जुलैऐवजी यंदा १४ ते २८ फेब्रुवारी २०२७ दरम्यान महिला चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेचे आयोजन करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच दहा संघांना सोबत घेऊन वीमेन्स इमर्जिंग नेशन्स ट्रॉफी २०२६ या स्पर्धेचे आयोजन करण्याचे नियोजन सुरू केले आहे.

आयसीसीने कॅनडाच्या क्रिकेट बोर्डाचे सदस्यत्व बरखास्त केले आहे. भ्रष्टाचार प्रकरणी आयसीसीने ही कठोर कारवाई केली आहे.

Comments
Add Comment