Sunday, May 31, 2026

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक पराक्रम! विराट-बाबरच्या एलिट क्लबमध्ये दमदार एन्ट्री

Harmanpreet Kaur: हरमनप्रीत कौरचा ऐतिहासिक पराक्रम! विराट-बाबरच्या एलिट क्लबमध्ये दमदार एन्ट्री

4000 टी-20 धावांचा टप्पा गाठणारी भारताची दुसरी महिला क्रिकेटर...

इंग्लंड : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर हिने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-20 सामन्यात इतिहास रचला आहे. आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेटमध्ये 4000 धावांचा टप्पा पार करत हरमनप्रीतने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला आहे. हा टप्पा गाठणारी ती स्मृती मंधानानंतरची दुसरी भारतीय महिला क्रिकेटपटू झाली आहे. तर जगातील केवळ तिसरी महिला खेळाडू ठरली आहे.

विराट, रोहित आणि बाबरच्या खास क्लबमध्ये स्थान

4000 धावांचा आकडा पार करताच हरमनप्रीतने क्रिकेटमधील दिग्गजांच्या एलिट क्लबमध्ये प्रवेश केला आहे. पुरुष आणि महिला क्रिकेट मिळून आंतरराष्ट्रीय टी-20 मध्ये 4000 किंवा त्याहून अधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये आता तिचे नावही सामील झाले आहे. या विशेष यादीत यापूर्वी विराट कोहली, रोहित शर्मा, बाबर आझम, जोस बटलर, स्मृती मंधाना आणि सुझी बेट्स यांचा समावेश झाला आहे. आता हरमनप्रीत कौरही या क्लबची सदस्य झाली आहे. सध्या महिला टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम न्यूझीलंडच्या सुझी बेट्स हिच्या नावावर आहे. हरमनप्रीतने 4000 धावांचा टप्पा गाठून भारतीय महिला क्रिकेटसाठी आणखी एक सुवर्णक्षण निर्माण केला आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Team India (@indiancricketteam)

पराक्रम झाला, पण भारताचा पराभव

हरमनप्रीतच्या ऐतिहासिक विक्रमाच्या दिवशी भारतीय संघाला पराभवाचा सामना करावा लागला आहे. इंग्लंडने प्रथम फलंदाजी करत 5 बाद 168 धावा केल्या आणि भारताला 169 धावांचे लक्ष्य दिले. या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय संघाने चांगली सुरुवात केली होती, पण मधल्या फळीतील संथ फलंदाजीमुळे सामना हातातून निसटून गेला. यास्तिका भाटिया हिने 33 धावांचे योगदान दिले, तर हरमनप्रीत कौरने 22 चेंडूत 28 धावा केल्या. मात्र तिची खेळी संघाला विजय मिळवून देऊ शकली नाही आणि भारताचा 26 धावांनी पराभव झाला.

मालिकेत झाली बरोबरी

सध्या भारत - इंग्लंड टी-20 मालिकेत दोन्ही संघांनी एक - एक अशी बरोबरी साधली आहे. मालिकेतील निर्णायक टी ट्वेंटी सामना २ जून रोजी होणार आहे. यानंतर भारतीय महिला संघाचे लक्ष 12 जूनपासून सुरू होणाऱ्या टी-20 विश्वचषकावर असेल.

4000+ टी-20 आंतरराष्ट्रीय धावा करणारे खेळाडू

सुझी बेट्स- 177 सामन्यात 4716 धावा

स्मृती मंधाना-161 सामन्यात 4244 धावा

हरमनप्रीत कौर- 196 सामन्यात 4109 धावा

विराट कोहली-125 सामन्यात 4188

रोहित शर्मा- 159 सामन्यात 4231

बाबर आझम-145 सामन्यात 4596

जोस बटलर-155 सामन्यात 4037

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >