Hardik Pandya : हार्दिक पांड्याचा मुंबई इंडियन्सला रामराम? 30 कोटींच्या शर्यतीत CSK, KKR आणि दिल्ली!

Hardik Pandya Leave Mumbai: आयपीएल 2026 मध्ये मुंबई इंडियन्सच्या निराशाजनक कामगिरीनंतर संघात मोठे बदल होण्याची शक्यता आहे. कर्णधार हार्दिक पांड्या मुंबई इंडियन्स सोडण्याच्या तयारीत असल्याची चर्चा क्रिकेट वर्तुळात रंगली आहे. यामुळे चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. आगामी लिलावात हार्दिकवर विक्रमी बोली लागू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.


2024 मध्ये मुंबई इंडियन्सने रोहित शर्माकडून कर्णधारपद काढून हार्दिक पांड्याकडे सोपवले होते. मात्र गेल्या तीन हंगामांमध्ये संघाला अपेक्षित यश मिळाला नाही. 2026 मध्ये तर मुंबईचा संघ गुणतालिकेत नवव्या स्थानावर राहिला. त्यामुळे व्यवस्थापन आणि चाहत्यांमध्ये नाराजी वाढल्याचे बोलले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, हार्दिकने मुंबई इंडियन्स व्यवस्थापनाकडे आपली भूमिका स्पष्ट केली आहे. तो 20 व्या हंगामात दुसऱ्या संघात जाण्याचा विचार करत आहे. जर तो आगामी आयपीएल लिलावात उतरला, तर त्याच्यावर 30 कोटी रुपयांपेक्षा अधिक बोली लागू शकते,असा अंदाज क्रिकेट तज्ज्ञ व्यक्त करत आहेत. हार्दिकला आपल्या संघात सामील करण्यासाठी चेन्नई सुपर किंग्स, कोलकाता नाइट रायडर्स आणि दिल्ली कॅपिटल्स हे तीन संघ सर्वाधिक उत्सुक असल्याची चर्चा आहे.


चेन्नई सुपर किंग्स : चेन्नई सुपर किंग्सला मधल्या फळीत अनुभवी अष्टपैलू खेळाडूची गरज आहे. हार्दिकच्या आगमनामुळे फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभाग मजबूत होऊ शकतात.


कोलकाता नाईट राइडर्स (KKR) : कोलकाता नाईट रायडर्सला भविष्यासाठी सक्षम कर्णधार हवा आहे. गुजरात टायटन्सला विजेतेपद मिळवून देणाऱ्या हार्दिककडे नेतृत्वाचा मोठा अनुभव असल्याने केकेआर त्याच्यावर मोठी बोली लावू शकते.


दिल्ली कॅपिटल्स (DC) : दिल्ली कॅपिटल्सकडे स्टार खेळाडूंची फौज असली तरी दर्जेदार भारतीय अष्टपैलू खेळाडूची कमतरता जाणवली आहे. हार्दिक संघात आल्यास दिल्लीचा समतोल अधिक मजबूत होऊ शकतो.


हार्दिक पांड्याच्या भवितव्याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. मात्र तो लिलावात उपलब्ध झाला, तर आयपीएलच्या इतिहासातील सर्वात मोठी ट्रान्सफर आणि बोली पाहायला मिळेल यात काही शंका नाही.

Comments
Add Comment

FIH Hockey World Cup : रोमहर्षक लढतीत भारताचा पाकिस्तानवर ५-३ ने विजय; पुरुष हॉकी विश्वचषकाच्या क्रॉसओव्हर फेरीत धडक!

हॉकी वर्ल्डकप २०२६ स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान यांच्यात रंगलेला हायव्होल्टेज सामना अत्यंत रोमांचक ठरला. या

BWF World Championships : लक्ष्य सेनला पराभवाचा धक्का; उन्नती हुडाचेही आव्हान संपुष्टात

नवी दिल्ली : भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनला बीडब्ल्यूएफ जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पराभवाला सामोरे

ICC Rankings : हॅरी ब्रूकची कसोटी फलंदाजांच्या क्रमवारीत अव्वल स्थानी झेप

ICC Ranking : इंग्लंडचा स्टार फलंदाज हॅरी ब्रूक पुन्हा एकदा आयसीसी पुरुष कसोटी क्रिकेटपटूंच्या क्रमवारीत जगातील अव्वल

Rohit Sharma : रोहित शर्माचे जोरदार पुनरागमन; वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी मुंबईच्या बीकेसी मैदानावर सुरू केला सराव

वांद्रे : भारताचा माजी कर्णधार रोहित शर्मा काही काळाच्या विश्रांतीनंतर मुंबईत परतला असून आगामी एकदिवसीय

BWF World Championships : जागतिक बॅडमिंटन स्पर्धेत भारताचा धडाका; लक्ष्य, उन्नती विजयी, ट्रीसा-गायत्री उपउपांत्यपूर्व फेरीत

नवी दिल्ली : भारतात सुरू असलेल्या BWF जागतिक अजिंक्यपद बॅडमिंटन स्पर्धेत भारतीय खेळाडूंची दमदार कामगिरी सुरू आहे.

Women's FIH Hockey World Cup : भारतीय महिलांचा विश्वचषकात धडाका; दक्षिण आफ्रिकेचा 6-1 ने धुव्वा, पुढची फेरी जवळपास निश्चित

ॲम्स्टेलवीन : FIH महिला हॉकी विश्वचषकात भारतीय महिला संघाने दमदार कामगिरी करत दक्षिण आफ्रिकेचा तब्बल 6-1 असा पराभव