Friday, May 29, 2026

Mumbai Gas Leak : दादरमध्ये गॅस पाइपलाइन फुटली, परिसरात खळबळ; शिवाजी पार्क- पोर्तुगीज चर्च मार्ग बंद

Mumbai Gas Leak : दादरमध्ये गॅस पाइपलाइन फुटली, परिसरात खळबळ; शिवाजी पार्क- पोर्तुगीज चर्च मार्ग बंद

Dadar : मुंबई मधील दादर परिसरात शुक्रवारी संध्याकाळी मोठी दुर्घटना घडली. दादर पश्चिमेतील Portuguese Church परिसरात महानगर गॅसची पाइपलाइन फुटली. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गॅस गळती झाली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. प्रशासनाने तातडीने सुरक्षा उपाययोजना सुरू केल्या आहेत.

नेमकं काय घडलं?

प्राथमिक माहितीनुसार, मुंबई महापालिकेकडून रस्त्यालगत झाडाचा बुंधा जेसीबीच्या सहाय्याने काढण्याचं काम सुरू होतं. यावेळी चुकून भूमिगत गॅस पाइपलाइनला धक्का लागला आणि पाइपलाइन फुटली. संध्याकाळी सुमारे ६.०५ वाजता ही घटना घडली. प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, पाइपलाइन फुटल्यानंतर गॅसचा जोरदार प्रवाह हवेत उडताना दिसत होता. गेल्या पाऊण तासाहून अधिक वेळ गॅस लीक सुरू असल्याची माहिती समोर येत आहे.

 
View this post on Instagram
 

A post shared by Prahaar Newsline (@prahaarnewsline)

प्रशासन अलर्ट मोडवर

घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दल, पोलीस, वाहतूक पोलीस आणि महानगर गॅसची टेक्निकल टीम घटनास्थळी दाखल झाली. गॅस गळती रोखण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. शिवाजी पार्क ते पोर्तुगीज चर्च मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आली आहे. परिसरातील नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे.

स्थानिक नगरसेवकाची प्रतिक्रिया

मनसेचे स्थानिक नगरसेवक Yashwant Killedar यांनी सांगितलं की, अग्निशामक दल, पोलीस आणि वाहतूक विभाग घटनास्थळी पोहोचले आहेत. वाहतूक वळवण्यात आली आहे. महानगर गॅसच्टीया टीमने लाईन स्विच ऑफ केली आहे आणि काम सुरु आहे. नागरिकांनी घाबरून जाऊ नये.

नागरिकांना आवाहन

प्रशासनाने नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आणि परिसरापासून दूर राहण्याचं आवाहन केलं आहे. सध्या परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न सुरू असून कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही.

Comments
Add Comment
प्रहार ई-पेपर
हे पण पहा
संबंधित बातम्या आणखी वाचा >